Sat, Feb 23, 2019 01:58होमपेज › Nashik › जिल्ह्याचा पारा ३८ अंशांवर

जिल्ह्याचा पारा ३८ अंशांवर

Published On: Apr 10 2018 1:14AM | Last Updated: Apr 09 2018 11:44PMनाशिक :  प्रतिनिधी

जिल्ह्याच्या पार्‍यात गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार पाहायला मिळत असून, सोमवारी (दि. 9) नाशिकमध्ये 38 अंश सेल्सियस इतके तापमान नोंदविण्यात आले. उन्हाच्या कडाक्याने सर्वसामान्य हैराण झाले आहेत. गत आठवड्यात नाशिकच्या पारा चाळीशी पार पोहचला होता. गेल्या दहा वर्षात पहिल्यांदाच एप्रिलच्या प्रारंभी पारा चाळीशी पार गेला. त्यामुळे नागरिकाची लाहीलाही होत आहे. गत दोन दिवसांमध्ये पार्‍यात दोन अंशाने घट झाली असली तरी उन्हाची दाहकता कायम आहे. दुपारी 12 ते 4 यावेळेत घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे.

उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक सर्वतोपरी खबरदारी घेत आहेत. दरम्यान, हवामानातील बदल कायम असून, पुढील काही दिवसांमध्ये अरबी समुद्रावर कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळेच जिल्ह्यात गारपिटीसह पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

Tags : Nashik, Nashik news, 38 degrees, mercury,