Thu, Jun 20, 2019 20:59होमपेज › Nashik › मराठा आरक्षण: नंदुरबार बंदला हिंसक वळण

मराठा आरक्षण: नंदुरबार बंदला हिंसक वळण

Published On: Jul 30 2018 2:18PM | Last Updated: Jul 30 2018 2:22PMनंदुरबार : प्रतिनिधी 

मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या बंद दरम्यान आज (सोमवार दिनांक ३० जुलै)  वाहनांच्या काचा फोडणे, दुकानांवर दगडफेक करणे, टायर जाळून निदर्शने करणे, असे प्रकार घडल्याने  या आंदोलनाला हिंसक वळण लागले. मराठा मोर्चा आणि सकल मराठा समाज संघटनांनी आज नंदुरबार जिल्हा बंद पुकारला होता. 

सकाळी अकराच्या दरम्यान संघटनेतील मान्यवरांसह आंदोलकांचा मोठा समूह बंदचे आवाहन करण्यासाठी शांततेने शहराच्या प्रमुख रस्त्यावरून निघाला होता. मात्र त्याच वेळी अनियंत्रित झालेल्या तरुणांनी हे सर्व प्रकार घडवले. शहरातील सर्व प्रमुख चौकात त्याने टायर पेटवून निदर्शने केली. दगडफेक सुरू झाल्याने सारे शहर ठप्प झाले. पोलिसांच्या वाहनांच्याही काचा फुटल्या.अनेक मोटारसायकलींचे नुकसान करण्यात आले. नंदुरबार बंद आंदोलनामुळे शहरातुन एकही बस बाहेर गेली नाही. 

दरम्यान, संघटनांच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. त्या ठिकाणीही मुख्यमंत्र्यांचा निषेध करणाऱ्या जोरदार घोषणा देण्यात आल्या.