Fri, Jul 19, 2019 01:30होमपेज › Nashik › नाशिक : मालेगावमध्ये मराठा मोर्चा आंदोलकांचा जलसमाधीचा प्रयत्‍न

नाशिक : मालेगावमध्ये मराठा मोर्चा आंदोलकांचा जलसमाधीचा प्रयत्‍न

Published On: Aug 10 2018 1:50PM | Last Updated: Aug 11 2018 1:21AMमालेगाव : प्रतिनीधी

मालेगाव तालुक्यात मराठा क्रांती ठोक मोर्चा आंदोलनाची धग वाढत चालली असून आज शुक्रवारी गिरणा नदीत युवकांनी जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये सोयगावचे माजी सरपंच ताराचंद बच्छाव, पिंटू पाटील, देवा पाटील, नगरसेवक जयप्रकाश बच्छाव, भूषण बच्छाव, दिलीप राजाराम बच्छाव, सोनू बच्छाव यांचा समावेश होता. 

मालेगाव महानगर पालिकेच्या अग्नीशमन अधिकारी संजय पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी वेळीच प्रसंगसावधान राखून सर्वांना बाहेर काढले. पोलिस उपअधीक्षक अजित हगवणे, नायब तहसीलदार एम. एस. कारंडे यांनी आंदोलकांच्या भावना जाणून घेत शासनाकडे आंदोलकांच्या भावना पोहचविण्याचे आश्वासन दिले. ताराचंद बच्छाव व पिंटू पाटील यांनी दहा दिवसापूर्वीच जलसमाधी घेण्याचा निर्णय घोषित केला होता. यावेळी आर. के. बच्छाव, निखील पवार,  भरत पाटील, रामा देवरे, डॉ. किशोर जाधव, पंडित जाधव, अशोक बच्छाव, कैलास बच्छाव, नंदू बच्छाव, राजू सूर्यवंशी, दिलीप बच्छाव, चिंधा बच्छाव, योगेश बच्छाव, बबन बच्छाव, शाम बच्छाव, सदानंद बच्छाव, लकी चिकनवाले, रहीम भाई, अमित बच्छाव, भैया बच्छाव, संजय महाले, रवी सूर्यवंशी व मोठ्या प्रमाणावर मराठा बांधव उपस्थित होते.