Sun, Nov 18, 2018 04:58होमपेज › Nashik › नाशिक : मराठा आंदोलकांचा जलसमाधी घेण्याचा प्रयत्‍न(व्हिडिओ) 

नाशिक: आंदोलकांचा जलसमाधीचा प्रयत्न(Video)

Published On: Jul 26 2018 12:05PM | Last Updated: Jul 26 2018 1:16PMसटाणा (जि. नाशिक): प्रतिनिधी

मराठा आंदोलकांनी ठेंगोडा येथील गिरणा नदीपात्रात जलसमाधी घेण्याचा प्रयत्‍न केला. पोलिसांनी मध्यस्‍थी करत या आंदोलकांना ताब्‍यात घेतल्‍यामुळे मोठा अनर्थ टळला. सकल मराठा समाज कार्यकर्त्यांनी गुरुवारी (दि.२६)ठेंगोडा येथील गिरणा नदीपात्रात जलसमाधी घेण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे पोलिसांनी मध्यरात्री काँग्रेस नगरसेवक  राहुल पाटील यांना ताब्यात घेतले. उर्वरित आंदोलक भूमिगत झाले होते. 

आंदोलकांचया इशाऱ्यामुळे ठेंगोडा येथे नदीपात्र परिसरात पोलिसांकडून खडा पहारा  देण्यात आला, तसेच शीघ्र कृती दल आणि दंगा नियंत्रण पथक तैनात करण्यात आले. राष्ट्रीय महामार्गवर ब्यारिकेट लावण्यात आले. तसेच परिसराला येवून मिळणाऱ्या सर्व रस्त्यांवर नाकेबंदी करण्यात आली. 

बुधवारी मध्यरात्रीपासून भूमिगत झालेले कार्यकर्ते अचानक भगवे झेंडे घेत घोषणा देत गुरुवारी सकाळी नदीपात्राजवळ येवून ठेपले. सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास एका पांधीतून अचानक आलेल्या कार्यकर्त्यांनी नदीत उड्या घेतल्या परंतु, पोलिसांनी तत्काळ नदीपात्रात उतरून आंदोलकांना ताब्यात घेतले.