Sat, Mar 23, 2019 18:09होमपेज › Nashik › मराठा समन्वय समितीचे  आता उपोषणाचे हत्यार

मराठा समन्वय समितीचे  आता उपोषणाचे हत्यार

Published On: Jul 26 2018 1:38AM | Last Updated: Jul 26 2018 12:59AMद्वारका : वार्ताहर

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी एकदिवसीय नाशिक बंद आंदोलन केल्यानंतर सकल मराठा समन्वय समिती नाशिकतर्फे गुुरुवार (दि.26) पासून जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयाबाहेर बेमुदत उपोषण केले जाणार आहे. तसेच या आंदोलनाला जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.समितीतर्फे करण गायकर यांनी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.

राज्यामध्ये ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले. नाशिकमध्ये काही अपवाद वगळता शांततेत आंदोलन पार पडले.आरक्षणासाठी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बेमुदत उपोषण केले जाणार आहे. जिल्ह्यातील खासदार, आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य यांनी उपोषणाच्या ठिकाणी येऊन आरक्षणच्या मागणीस पाठिंबा द्यावा, अशी मागणी यावेळी समितीतर्फे करण्यात आली. लोकप्रतिनिधी उपोषणस्थळी पाठिंबा देण्यासाठी उपस्थित न राहिल्यास त्यांच्या घरासमोर आंदोलन केले जाईल, असा इशारा समितीतर्फे देण्यात आला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आरक्षणासाठी छत्रपत्री संभाजीराजे भोसले आणि छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याशी चर्चा करावी. ज्या आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ते मागे घ्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.