होमपेज › Nashik › लातुरमध्ये मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या

लातुरमध्ये मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या

Published On: Aug 20 2018 9:53PM | Last Updated: Aug 20 2018 9:53PMऔसा : प्रतिनिधी 

औसा तालुक्यात मराठा आरक्षणासाठी आत्महत्यांचे सञ सुरुच असून हिप्परगा (कवळी) येथील तरूणाने करजगाव या आपल्या मामाच्या गावात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. नितीन पांडुरंग घोगरे (२४) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

औसा तालुक्यातील हिप्परगा (कवळी) येथील नितीन घोगरे या तरूणाने करजगाव येथील त्याचे मामा हणमंत मधुकर रावते यांच्या घरात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत नितीन याचे शिक्षण एमकॉमपर्यंत झाले आहे. 

गेल्या वर्षी बहिणीच्या लग्नात मोठा खर्च झाला होता. नोकरी लागत नसल्याने कुटुंबाचा खर्च झेपत नसल्याची खिशात चिठ्ठी लिहून ठेवली आणि आत्महत्या केली असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. मराठा समाजाला आरक्षण नसल्याने नोकरी लागत नाही म्हणून निराश होऊन त्याने गळफास घेतला. या घटनेची नोंद मृताचे आजोबा यांच्या फिर्यादीवरून औसा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. पुढील तपास औसा पोलीस करीत आहेत.