Wed, Jul 17, 2019 10:01होमपेज › Nashik ›  मालेगाव प्रांताधिकारी, तहसीलवर मनपाची कारवाई 

 मालेगाव प्रांताधिकारी, तहसीलवर मनपाची कारवाई 

Published On: Jan 31 2018 12:06PM | Last Updated: Jan 31 2018 12:06PMमालेगाव : प्रतिनिधी

घरपट्टी व पाणीपट्टी थकविल्याप्रकरणी महापालिकेच्या पथकाने बुधवारी सकाळी प्रांताधिकारी, तहसील आणि जुन्या तहसील कार्यालयातील जंगम मालमत्तेवर अटकावणीची कारवाई ही केली. सुमारे सव्वा चार लाख रुपयांचा मालमत्ता कर थकीत आहे. त्यासंदर्भात बजावलेल्या नोटीसला मुदतीत योग्य उत्तर न दिल्याने मालेगावच्या इतिहासात प्रथमच अशी कठोर कार्यवाही झाली. 

दरम्यान, मंगळवारी महसूल विभागाने थकीत महसूल वसुलीसाठी मनपाची दोन वाहने जप्त केली आहेत.