Fri, May 24, 2019 09:23होमपेज › Nashik › बोगस अपंग प्रमाणपत्र समितीकडून १६१ शिक्षकांच्या कागदपत्रांची तपासणी

बोगस अपंग प्रमाणपत्र समितीकडून १६१ शिक्षकांच्या कागदपत्रांची तपासणी

Published On: Dec 22 2017 1:28AM | Last Updated: Dec 21 2017 11:19PM

बुकमार्क करा

मालेगाव : प्रतिनिधी

प्रशासकीय बदलीत सवलत मिळविण्यासाठी अपंगत्वाचे बोगस प्रमाणपत्र सादर केलेल्या शिक्षकांची शोधमोहीम सुरू झाली आहे. त्याअंतर्गत मालेगाव पंचायत समितीत गुरुवारी 161 शिक्षकांच्या प्रमाणपत्र व कागदपत्रांची तपासणीची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत राबविण्यात आली. त्याचा अहवाल लवकरच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना सादर केला जाणार आहे.

बोगस अपंग प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी नाशिक जिल्हा परिषदेेच्या ‘सीईओं’नी दहा शिक्षकांवर  निलंबनाची कारवाई करतानाच खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश गटशिक्षणाधिकार्‍यांना दिले आहेत. त्याप्रमाणे तालुकास्तरावर अपंग प्रमाणपत्र तपासणी समिती गठीत करत प्रत्यक्ष तपासणीला प्रारंभ झाला आहे. मालेगाव पंचायत समितीच्या गटांतर्गत 161 शिक्षकांनी अपंग प्रमाणपत्र सादर केले होते. त्यात काही दुर्धर आजाराने ग्रस्त, तसेच गतिमंद पाल्यांचादेखील समावेश आहे. गुरुवारी सकाळी 10 पासून पंचायत समितीत अपंग शिक्षकांची गर्दी झाली होती. प्रत्यक्ष 11 वाजता तपासणी सुरू झाली. 

गटविकास अधिकारी आनंद पिंगळे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. शैलेशकुमार, डॉ. शिवाजी निकम, डॉ. अभिजित सोनजे, गटशिक्षण अधिकारी शोभा पारधी यांच्या समितीने सदरची कार्यवाही केली. तपासणी अहवाल जिल्हा परिषदेला सादर केला जाईल. बोगस प्रमाणपत्रे आढळल्यास संबंधितावर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, असे गटविकास अधिकारी पिंगळे यांनी सांगितले.