मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात बस सेवा बंद

Last Updated: Nov 10 2019 1:38AM
Responsive image


जळगाव : प्रतिनिधी 

अयोध्येतील वादग्रस्त जमीन प्रकरणाचा आज निकाल जाहीर झाला. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून मध्य प्रदेश परिवहन तर्फे बस सेवा पूर्ण पणे बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे सकाळपासून रावेर (महाराष्ट्र) बुऱ्हानपूर (मध्य-प्रदेश) बससेवा पूर्ण पणे बंद आहे. जरी मध्य प्रदेश परिवहन्या गाड्या जरी बंद असल्या तरी महाराष्ट्र परिवहनच्या बसेस मात्र सुरु आहे. 

आज राम जन्मभूमीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला. मध्य प्रदेशने खबरदारीचा उपाय म्हणून संवेदनशील असलेल्या बुऱ्हानपूर (मध्य प्रदेश) शहरातील बससेवा पूर्णपणे थांबवण्यात आली आहे. तसेच शहरात तगडा पोलिस बंदोबस्त  ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आज सकाळपासून मध्य प्रदेशातील बुऱ्हानपूर येथून एकही बस रावेरमध्ये आलेली नाही तर इकडे महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या बसेस मात्र बुऱ्हानपूर मध्य प्रदेशामध्ये जात आहेत.