Sat, Nov 17, 2018 19:16होमपेज › Nashik › नाशिकचे प्रेमीयुगूल परतूरजवळ सापडले

नाशिकचे प्रेमीयुगूल परतूरजवळ सापडले

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

परतूर : प्रतिनिधी

नाशिक शहरातून दहावीच्या परीक्षा केंद्रावरुन गायब झालेली 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी अनुराधा (नाव बदलले आहे) ही आपल्या प्रियकरासोबत बुधवारी परतूर तालूक्यातील मसला शिवारात आढळून आली.

नाशिक शहरातील अंबड पोलिस ठाण्याअंतर्गत असणार्‍या आंबेडकरनगर भागातील दहावीच्या वर्गात शिक्षण घेणार्‍या या मुलीचे अज्ञात व्यक्तीने अपहरण करून पळवून नेल्याची तक्रार २२ मार्च नोंदविण्यात आली होती. याबाबत सर्व पोलिस ठाण्यांना संबंधित मुलीचे वर्णन असलेली माहिती कळविण्यात आली होती. ही मुलगी प्रियकर करण भरत पगारे याच्यासोबत परतूर तालुक्यात असल्याबाबत अंबड पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर ही कार्यवाही करण्यात आली. मसला येथील एक व्यक्तीने काही दिवसापूर्वी नाशिक येथील कामास होता. तेथील त्याची करणशी ओळख झाली होती. करण चार दिवसापूर्वी प्रेयसीला घेवून मसला येथील आला आणि आमचे लग्न झाल्याची खोटी माहिती मित्राला दिली होती. उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष वाळके, पोलिस निरीक्षक रामेश्वर रेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विजय जाधव, सय्यद मजीद, शाम गायके यांच्या पथकाने प्रेमी युगुलाला ताब्यात घेतले आणि नाशिकचे पोलिस उपनिरीक्षक परदेशी यांच्या स्वाधीन केले.


  •