Mon, Feb 18, 2019 05:24होमपेज › Nashik › नाशिक : लाँग मार्चसाठी शेतकर्‍यांची जय्यत तयारी

नाशिक : लाँग मार्चसाठी शेतकर्‍यांची जय्यत तयारी

Published On: Mar 06 2018 3:41PM | Last Updated: Mar 06 2018 3:41PMनाशिक : प्रतिनिधी 

शेतकर्‍यांना कर्जमुक्ती मिळावी, शेतमालाला हमीभाव मिळावा या मागणींसाठी अखिल भारतीय किसान मोर्चाच्या नेतृत्वात शेतकर्‍यांचा लाँग मार्च मुंबईकडे निघणार आहेत. या मोर्चासाठी शेतकर्‍यांची तयार चालू असून रवाना होण्याच्या तयारीत आहेत.

शेतकर्‍यांच्या समस्या दिवसेंदिवस उग्र रुप धारण करत आहेत. शासन त्यावर मार्ग काढण्यात अपयशी ठरत आहे. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी भारतीय किसान मोर्चा थेट विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर धडक देणार आहे.