होमपेज › Nashik › परराज्यातील मद्यसाठा जप्‍त

परराज्यातील मद्यसाठा जप्‍त

Published On: Jul 19 2018 1:38AM | Last Updated: Jul 19 2018 12:30AMनाशिक : प्रतिनिधी

परराज्यातील मद्यसाठ्याची वाहतूक करणार्‍यास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय भरारी पथकाने अटक केली आहे. केशव रामधन राठोड (32, रा. जालना) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून वाहनासह सुमारे साडेसहा लाख रुपयांचा मद्यसाठा जप्‍त करण्यात आला आहे. 

सोमवारी (दि.16) मध्यरात्री पेठरोडवरील हॉटेल राऊ समोरील चौकात भरारी पथक वाहनांची तपासणी करीत होते. त्यावेळी  अमेझ कारमधून वाहतूक होणारा सुमारे साडे सहा लाख रूपये किमतीचा मद्यसाठा पथकाच्या हाती लागला आहे. या प्रकरणी कारचालकास बेड्या ठोकण्यात आल्या असून, ही कारवाई विभागीय भरारी पथकाने केली. एमएच 17 एझेड 6677 क्रमांकाच्या अमेझ कारमधून संशयित केशव राठोड हा संशयास्पदरित्या जाताना पथकास आढळला. त्यामुळे पथकाने त्याच्या वाहनाची चौकशी केली असता कारमध्ये फक्‍त दादरा नगर हवेली येथे विक्रीस परवानगी असलेला दारुसाठा आढळून आला. त्यात विदेशी मद्याचे दहा बॉक्स आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी वाहनासह मद्यसाठा असा एकूण 6 लाख 44 हजार रुपयांचा ऐवज जप्‍त केला आहे. संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपआयुक्‍त प्रसाद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे निरीक्षक एम. बी. चव्हाण, दुय्यम निरीक्षक डी. एन. पोटे, जवान कैलास कसबे, अमित गांगुर्डे, दीपक आव्हाड, विठ्ठल हाके आदींच्या पथकाने केली.