Wed, Mar 27, 2019 05:59होमपेज › Nashik › खेड येथील देवाची वाडीत दारूचा अड्डा उद्ध्वस्त!

खेड येथील देवाची वाडीत दारूचा अड्डा उद्ध्वस्त!

Published On: Apr 26 2018 2:02AM | Last Updated: Apr 25 2018 11:32PMघोटी : वार्ताहर

खेड भैरवनाथ येथील ग्रामपंचायत हद्दीतील देवाचीवाडी येथील गावठी दारू अड्ड्यावर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक ग्रामीण विशाल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी अतुल झेंडे, सहायक पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी (दि.25) सकाळी 7 ते 11 वाजेदरम्यान छापा टाकण्यात आला. या छाप्यात लाखो रुपये किमतीचे साहित्य नष्ट करण्यात आले.

विशेष गोपनीय अधिकार्‍यांच्या माहितीनुसार घोटीचे सहायक पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांनी पोलिसांच्या धाडसी पथकाची नेमणूक केली. या पथकाने येथील दुर्गम घनदाट जंगलात गावठी दारूच्या हातभट्टीवर छापा टाकत तब्बल 28 ड्रम विषारी रसायन मिश्रण असलेले प्रतिलिटर 50 प्रमाणे एकूण दोन लाख 80 हजार रुपये किमतीचे विषारी रसायन, 50 हजार रुपये किमतीचे जळाऊ लाकूड, 5600 रुपये किमतीचे प्लास्टिक ड्रम आदींसह मुद्देमाल साधनसामग्री नष्ट करण्यात आली.

पोलिसांची चाहूल लागताच अज्ञातांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत पळ काढला. संशयितांना पकडण्यासाठी विशेष पथक नेमण्यात येणार असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांनी दिली. घनदाट जंगल परिसर असल्याने गावठी दारू अड्ड्यावरील इसमांकडून पोलिसांवर हल्ले झाल्याच्या घटना ताज्या असल्याने हा छापा टाकण्यात आला.

Tags : Nashik, liquor seized , nashik news,