Thu, Jan 24, 2019 18:17होमपेज › Nashik › पंचवटीत गुन्हेगारांची झाडाझडती, दारू अड्डे केले उद्ध्वस्त

पंचवटीत गुन्हेगारांची झाडाझडती, दारू अड्डे केले उद्ध्वस्त

Published On: Aug 02 2018 2:00AM | Last Updated: Aug 01 2018 10:36PMपंचवटी : वार्ताहर 

पंचवटी परिसरात वाढते गुन्हे आणि सराईत गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी पंचवटी पोलीस ठाण्यातर्फे झोपडपट्टी भागात कोम्बिंग ऑपरेशन घेण्यात आले. यामध्ये अनेक सराईत गुन्हेगारांच्या घरांची झडती घेण्यात आली. वैशालीनगरमध्ये असलेले गावठी दारूचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले.

पंचवटीचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांनी मंगळवारी संध्याकाळी  फुलेनगर, लक्ष्मणनगर, भराडवाडी, गौंडवाडी, गजानन चौक, तेलंगवाडी, शेषराव महाराज चौक, महाराणा प्रताप चौक, विद्युतनगर, नवनाथनगर या भागात कोम्बिंग ऑपरेशन मोहीम राबविली. यामध्ये रेकॉर्डवरील, तडीपार अशा 23 गुन्हेगारांच्या घरांची झडती घेतली. फुलेनगर येथील मनपा शाळा क्रमांक 56 मध्ये असलेल्या वैशालीनगर आणि लक्ष्मणनगरमधील गावठी दारूचा अड्डा उद्ध्वस्त करून 1400 लिटर गावठी दारू आणि दारू बनविण्याचे रसायन रस्त्यावर ओतून नष्ट करण्यात आले. तसेच देशी दारूच्या 23 बाटल्या असा एकूण 22 हजार 144 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड, पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, सहायक पोलीस निरीक्षक कैलास वाघ, देवीदास इंगोले, रघुनाथ शेगर, वाल्मीक शार्दुल, गिरमे, उपनिरीक्षक योगेश उबाळे, अश्‍विनी मोरे उपस्थित होते.