होमपेज › Nashik › बिबट्याच्या हल्ल्यात पाळीव कुत्र्याचा मृत्यू

बिबट्याच्या हल्ल्यात पाळीव कुत्र्याचा मृत्यू

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

मातोरी गावात शनिवारी (दि.25) पहाटेच्या सुमारास बिबट्याने फकिरा रामचंद्र साठे यांच्या घरासमोर बांधलेल्या पाळीव कुत्र्यावर हल्ला केला. यात कुत्र्याचा मृत्यू झाला असून, बिबट्याने पाळीव प्राण्यांना आपले भक्ष्य केल्याने स्थानिक शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमुळे गेल्या काही दिवसांपासून मातोरी शिवारात बिबट्याचा वावर असल्याबाबतच्या चर्चेला दुजोरा मिळाला आहे. त्यामुळे शिवारात पिंजरा लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. 

मातोरी व परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा संचार असल्याची ग्रामस्थांमध्ये चर्चा होती. अनेकांकडून ही अफवा असल्याचे बोलले जात होते. परंतु शनिवारी पहाटे बिबट्याने मातोरी येथील शेतकरी फकिरा रामचंद्र साठे याच्या घरासमोर बांधलेल्या पाळीव लॅब्राडॉग जातीच्या कुत्रीवर हल्ला केला. साठे यांचा मुलगा रवि हा काहीतरी आवाज आल्याने घराबाहेर आला. बाहेरची लाईट लावताच बिबट्याने धूम ठोकली. बिबट्याने कुत्रीला पूर्णतः फाडून टाकले होते. प्रचंड रक्‍तस्त्रावाने काही क्षणातच कुत्रीचा मृत्यू झाला.