Fri, Nov 16, 2018 06:40होमपेज › Nashik › लासलगावला ८० लाखांचा घोटाळा

लासलगावला ८० लाखांचा घोटाळा

Published On: Mar 01 2018 11:03PM | Last Updated: Mar 01 2018 10:52PMलासलगाव : वार्ताहर

भरघोस कमिशन देण्याचे तसेच,  गुंतवणूक  केलेल्या  रकमेवर घसघशीत  परतावा मिळविण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणार्‍या सिट्रस चेक इन्स व रॉयल ट्विंकल स्टार या कंपनीचे चेअरमन  ओमप्रकाश गोयंका व त्यांच्या सहकार्‍यांवर ठेवीदारांची सुमारे 80 लाख रुपयांची फसवणूक व अपहार केल्याप्रकरणी   लासलगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुंतवणुकदारांना तिप्पट-चौपट पैसे देण्याचे आमिष दाखवून ट्विंकल कंपनीने लासलगाव व परिसरातील नागरिकांना सुमारे 100 कोटी  रुपयांचा चुना लावल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ट्विंकल कंपनीने  गुंतवणुकदारांची व्याजासह मोठ्या रकमेचा फायदा मिळवा, असे आमिष दाखवून मुंबईस्थित या चिटफंड कंपनीने राज्यात मोठा घोटाळा केला यावर कंपनी चालकाने न थांबता कंपनीचे नाव बदलून सिट्रस या नावाने कंपनीने हजारो कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचे समजतआहे. कमी वेळेत जास्त व्याजाचे आमिष दाखवून  हे ठकसेन एजंटला 30 ते 35 टक्के कमिशन देवून नागरिकांकडून मोठमोठ्या रकमा उकळण्याचे काम करतात. लासलगाव व परिसरातून तब्बल 100 कोटी रुपयांच्या ठेवी गोळा केल्याचे वृत्त आहे. लासलगाव  येथील कविता अनिल पगारे यांनी पती अनिल यांच्या  निधनानंतर  मिळालेली 15 लाख 300 रुपयांची  रक्कम यामध्ये गुंतवणूक  केली. तसेच, परिवाराची  रक्कम विविध नावाने गुंतवली. परंतु ही रक्कम मिळाली  नाही.  तसेच, लासलगाव  येथील  अनिल गवळी, विजय भोर, रूपेश पांडे, पंकज सुर्वे, संतोष जगताप, संतोष खाडे, तसेच देवळा येथील दीपक पगार व डॉ. भूषण आहेर या एजंट्समार्फत रकमा गुंतवणूक  केल्या. या कंपनीने लासलगाव येथील  कोटमगाव रोडवर बँक ऑफ इंडियाच्या लासलगाव शाखेवर मोठी गुंतवणूक  करून स्वमालकीचे कार्यालय उभारले आहे. या कार्यालयात  ठेवीदारांनी वारंवार चकरा मारल्या. परंतु  रक्कम  देण्यास  टाळाटाळ  केली  जातेे. तसेच, सध्या हे कार्यालय बंद आहे. या कंपनीत आर्थिक  फसवणूक  झालेल्या गुंतवणुकदारांची वाढती संख्या  पाहता या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून, मोठा घोटाळा उघडकीस येईल असे लासलगावचे  सहायक पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांनी सांगितले.