Mon, Jun 17, 2019 02:13होमपेज › Nashik › चाकू हल्ल्यातील जखमीचा मृत्यू

चाकू हल्ल्यातील जखमीचा मृत्यू

Published On: Feb 12 2018 2:00AM | Last Updated: Feb 12 2018 1:26AMनाशिक : प्रतिनिधी

डोक्यात का मारले याचा जाब विचारल्याचा राग आल्याने संशयितांनी युवकाच्या पोटात चाकूने वार केल्याची घटना 29 जानेवारीला रात्री आठच्या सुमारास घडली होती. या घटनेतील जखमी बबन सोमा बेंडकुळे (25, रा. शिवशक्ती चौक, शिवाजीनगर) या युवकाचा उपचारादरम्यान, रविवारी (दि.11) मृत्यू झाला. फरार संशयितांचा गंगापूर पोलीस शोध घेत आहेत.

बबन आणि संशयित आकाश सुरेश पवार (रा. शिवशक्ती चौक) हे एकमेकांच्या ओळखीचे होते. बबन त्याच्या घराजवळून जात असताना दुचाकी (क्र. एमएच 15 सीएक्स 0355) वरून आलेला संशयित आकाश पवार याने बबनच्या डोक्यात चापट मारली. त्यामुळे बबन याने आकाशकडे याची विचारणा केली. त्याचा राग आल्याने आकाशने तुषार दिनेश लांडे (26) याच्यासह मिळून बबनला मारहाण केली. आकाशने त्याच्याकडील चाकूने बबनच्या अंगावर वार केल्याने त्यास गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी बबनला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.याप्रकरणी संशयित तुषार लांडे यास अटक केली. बबनला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. तेथे उपचारादरम्यान, बबनचा मृत्यू झाला.