Fri, Sep 21, 2018 15:47



होमपेज › Nashik › सहकार बळकट करणार : ना. देशमुख 

सहकार बळकट करणार : ना. देशमुख 

Published On: Dec 08 2017 1:40AM | Last Updated: Dec 07 2017 11:40PM

बुकमार्क करा





कळवण : वार्ताहर

उद्योग, व्यवसाय अडचणी दूर करून ते सुरू करण्यासाठी तसेच सहकार क्षेत्राला बळकट करण्याचे धोरण राबविण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केले.

राज्य कृषी पणन मंडळाने उभारलेल्या शेतमाल निर्यात सुविधा केंद्राच्या उद्घाटनाप्रसंगी सहकारमंत्री देशमुख  बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण, आमदार डॉ. राहुल आहेर, आमदार जे. पी. गावित, आमदार प्रवीण दरेकर, पणनचे कार्यकारी संचालक सुनील पवार, केदा आहेर आदींसह मान्यवर उपस्थित होते.

शेतकर्‍यांची गरज ओळखून नाशिकमध्ये टर्मिनल मार्केटची उभारणी सरकारच्या विचारात आहे. असे सांगताना ना. देशमुख म्हणाले की, नाशिक जिल्हा कांद्याचे आगर आहे. जेव्हा कांद्याला चांगला भाव मिळतो, जे कांदा खात नाही तेच भाववाढीमुळे ओरड करीत असतात.  शेतकर्‍यांना दोन पैसे जास्त मिळत असतील तर कोणीही आड येण्याची गरज नाही, असे देशमुख म्हणाले. शेतकर्‍याला बाजार समितीसाठी मतदान करण्याचा कायदा केल्याचे सांगून आता खरा शेतकरी बाजार समितीचा राज्यकर्ता होणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. यावेळी आमदार प्रवीण दरेकर यांनी सहकार क्षेत्राला मदत करण्यासाठी शासन तयार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पणनचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी केले. यावेळी शेतकी संघाचे चेअरमन सुधाकर पगार, निंबा पगार, जितेंद्र पगार, रवींद्र देवरे, धनंजय पवार, अ‍ॅड. संजय पवार आदींसह कळवण देवळा तालुक्यातील सर्व सोसायट्यांचे संचालक, सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच उपसरपंच, मान्यवर व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.