Thu, Aug 22, 2019 13:07होमपेज › Nashik › दोन बसेसच्या अपघातात १ ठार, २५ जखमी

दोन बसेसच्या अपघातात १ ठार, २५ जखमी

Published On: Jul 14 2018 6:28PM | Last Updated: Jul 14 2018 6:28PMजळगाव : प्रतिनिधी 

पारोळा येथील राष्ट्रीय महामार्गावरील  तुराटखेडा गावानजीक पारोळ्याकडून जळगाव कडे जाणारी  महामंडळाची शिवशाही बस व अकोल्याहून सुरतला  लग्नासाठी जाणारी लक्झरी बस यांच्यात समोरा समोर धडक झाली. या अपघातात दोन वाहनातील सुमारे २५ जण जखमी झाले आहेत तर एकाचा जागीच मृत्‍यू  झाला आहे. ही घटना आज दि १४ ला पहाटे ६ वा घडली.

याबाबत अधिक माहिती अशी, अकोला येथून शाह कुटुंब हे गजानन लक्झरी क्र एम एच ३० ए ए  ७५६४  या खाजगी लक्‍झरीने सुरत येथे जात होते तर पारोळ्याकडून जळगावकडे जाणारी महामंडळाची शिवशाही वातानुकूलीत बस क्र एम एच १८-बी जि-१५८५ यांच्यात सकाळी ६ वाजता भीषण अपघात झाला. 

या अपघातात शाह कुटुंबातील निलेश मांडविया,हितेश ईश्वर शाह,साकरचंद प्रेमचंद शाह,ईश्वर साकरचंद शाह,शाशीभाई शाह,भारत ईश्वर शाह,मिटाबेन ईश्वर शाह,निटाबेन शाह,एकता मोंटु शाह,जयंतीबेन शाह,काजल हितेश शाह,दिनल शाह,ध्रुवी शाह,पार्थ भरत शाह,जयमन योगेश शाह,चार्मी योगेश शाह,बिना योगेश शाह हे गंभीर जखमी तर किरकोळ ८ जण जखमी झाले होते तर शिवशाही बसमधील १० ते १५  गंभीर जखमी रुग्णांना एरंडोल येथे घटनास्थळावरून हलविले होते. सर्व जखमींना जळगाव येथे हलविण्यात आले आहे. योगेश कांतीलाल शाह वय 45 यांचा जागीच मृत्यू झाला.  या अपघातानंतर शाह परिवाराच्या नातेवाईकांनी कुटीर रुग्णालयात गर्दी करून एकच आक्रोश  केला होता. या अपघातात यातील मयत योगेश शाह हे अकोला जनता बँकेचे चेअरमन असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. शाह कुटुंब हे सुरत येथे रविवारी भाऊबंदकित लग्न असल्याने रात्री अकोला येथून हे निघाले होते. त्यांच्यावर क्रूर काळाने पारोळ्याजवळ घाला घातला. या अपघातामुळे शाह कुटुंब हे फारच भेदरलेल्या अवस्थयेत होते.

रुग्णवाहिका चालकांची मदतीसाठी धावपळ

पहाटे अपघात होताच तुराटखेडा, मराठखेडा,सावखेडा होळ येथील तरुण मंडळीनी मदत करीत एरंडोल, पारोळा,कासोदा,बहादरपूर येथील  १०८ रुग्णवाहिकांना बोलावून गाड्यांना तोडून काचा फोडून जखमींना बाहेर काढून रुग्णवाहिकेत रुग्णांना एरंडोल,पारोळा येथे हलविले

पारोळा कुटीरला वैद्यकीय अधिकारी नसल्याने १०८ चे डॉक्टर डॉ सुनील पारोचे,डॉ धनंजय पाटील,डॉ राहुल जैन,डॉ योगेश साळुंखे,परिचारिका चारुशीला संघपाल, दीपक सोनार,प्रमोद सुर्यवंशी, रोशन पाटील,ईश्वर ठाकूर,राजू वानखेडे  व खाजगी डॉक्टरांनी उपचार केले हे विशेष.

इंडियन रक्त पेढीच्या उज्वला वर्मा यांची अपघात ग्रस्थाना मदत 

जळगाव येथील इंडियन रेड क्रॉस सोसायटी रक्त पेढीच्या पी आर ओ उज्वला वर्मा ह्या त्यांच्या रक्तपेढीच्या जीपमध्ये जळगाव वरून धुळ्याकडे जात असताना त्यांना रस्त्यावर अपघातस्थळी थांबून, चार गंभीर जखमींना पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल करून माणुसकी दाखविली.

रूग्णालयात मलकापूर चे उधोजक तीलकचंद नरसिदंड,माजी नगराध्यक्ष सुरेंद्र बोहरा,एरंडोलचे नरेंद्र राजपूत, दिलीप भाई मेथाजी, टिलेश भाटे,संजय पाखले,नितीन भोपळे,प्रमोद कासार,कमलेश लुणावत, जगदीश गुजराथी आदींनी भेट देऊन जखमींना मदत केली