Tue, Apr 23, 2019 13:36होमपेज › Nashik › मुलगी पाहण्यासाठी जाताना अपघातात कुटुंबातील ३ ठार 

मुलगी पाहण्यासाठी जाताना अपघातात कुटुंबातील ३ ठार 

Published On: Mar 23 2018 4:29PM | Last Updated: Mar 23 2018 4:29PMजळगाव : प्रतिनिधी

जळगाव येथील पिंप्राळा हुडको परिसरात राहत असलेले शेख कुटुंबिय अ‍ॅपे रिक्षाने एरंडोल मार्गे कासोदा येथे मुलगी बघण्याच्या कार्यक्रमाला जात होते. एक किलो मीटर अंतराव एरंडोल राहिले असतांना समोरून ओव्हरटेक करणार्‍या आयरशरने अ‍ॅपे रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात शेख कुटूंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला तर इतर चार जण जखमी असून त्यांना जिल्हा  सामान्य रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

 शहरातील पिंप्राळा हुडको भागात राहणारे शेख अल्लाउद्दीन शेख कुटुबिय अनु शेख (वय 20) यांच्या लग्‍नासाठी मुलगी पाहण्यासाठी 23 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास कसोदा येथे अ‍ॅपेरिक्षा क्रमांक एम.एच.19 व्हि 7356 मधुन निघाले होते. यावेळी रिक्षात अल्लाउद्दीन शेख, शाहनूरबी शेख मजीद, अनू शेखा, गायसोद्दीन शेख, परवीनबी शेख, तमन्ना बी शेख हे बसलेले होते. अ‍ॅपेरिक्षा ही एरंडोलपासून 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या पद्मालय हॉस्पीटलजवळ आली असता, समोरून ओव्हरटेक करित येत असलेल्या भरधाव आयशरने अ‍ॅपे रिक्षाला जोरदार धडक दिली  या अपघात अ‍ॅपेरिक्षा चकनाचुर झाली. तर या अपघातात अल्लाउद्दीन यांचा मोठा मुलगा शेख गायसोद्दीन शेख अलौद्दीन (वय 45),परवीन बी गायसोद्दीन (40) व तमन्ना बी गायसोद्दीन (9) हे जागीच ठार झाले तर अनु शेख, शाहरनुरबी मजीद, अल्लाउद्दीन शेख व जरीना अल्लाउद्दीन शेख हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहे.