Wed, Feb 20, 2019 03:28होमपेज › Nashik › शेलवडला वीज कोसळून एक ठार ; एक जखमी 

शेलवडला वीज कोसळून एक ठार ; एक जखमी 

Published On: Jun 23 2018 4:15PM | Last Updated: Jun 23 2018 4:15PMजळगाव : प्रतिनिधी

शेतात काम करत असतांना अंगावर वीज कोसळून एक युवक ठार तर एक महिला जखमी झाल्याची घटना शनिवार रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास बोदवड तालुक्यातील शेलवड येथे घडली. जखमी महिलेवर जिल्हा सामान्य रुग्णालयात  उपचार सुरू आहेत.

शनिवार रोजी शेलवड येथे शेतात 14 लोक काम करत होते. 11 वाजण्याच्या सुमारास जितेंद्र सुभाष माळी हा 24 वर्षीय युवक 14 लोकांच्या समुहापासून वेगळा  झाला आणि काही अंतरावर जाताच आकाशातुन कोसळणा­या वीजेने त्यास गाठले. वीज जितेंद्रच्या अंगावर कोसळल्‍याने जितेंद्र याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात सोनाली निलेश माळी वय 20 या जखमी झाल्‍या असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मयत जितेंद्र हा नाशिक येथून गावात आला होता. पाऊस पडला असल्याने शेतात जावून शेती कामाचा  आनंद घ्यावा यासाठी तो शेतात आला होता. त्याच्या पश्चात दोन विवाहित बहिणी, एक भाऊ असा परिवार आहे,