Fri, Jul 19, 2019 17:58होमपेज › Nashik › 'निवडणुकीसाठीच चिल्‍लर गोळा करत होतो'

'निवडणुकीसाठीच चिल्‍लर गोळा करत होतो'

Published On: Jul 05 2018 4:45PM | Last Updated: Jul 05 2018 4:45PMजळगाव : प्रतिनिधी 

महापालिका निवडणूक जाहीर होवून अनामत रक्कम भरण्यास व अर्ज सादर करण्यास बधवारपासून सुरूवात झाली. मात्र काल बुधवारी एकाही इच्छुकांने अनामत रक्कम भरली किंवा अर्ज सादर केला नव्हता. आज मात्र, प्रभाग क्रं 2 मध्ये अनामत रक्कम भरण्यासाठी नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी चक्‍क 1 व 2 रूपयांचे कॉईन आणले होते. दारकुंडे यांनी पत्नी जोत्सना दारकुंडे यांच्यासाठी अनामत रक्कम चिल्‍लरच्या स्‍वरूपात भरून पहिली पावती फाडली. 

महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावर प्रभाग क्र. 1, 2 व 3 साठी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांचे कक्ष आहे. या कक्षात नवनाथ विश्‍वनाथ दारकुंडे व त्यांची पत्नी जोत्सना दारकुंडे या दोघा पती-पत्नींचे मिळून 5 हजार रूपयांची अनामत रक्कम 1 व 2 रूपयांच्या कॉईनच्या स्वरूपात भरली. या कॉईनने भरलेल्‍या पिशवीचे वजन तब्‍बल 14 किलो 400 ग्रॅम इतके होते. ही पिशवी त्यांचा मुलगा सिध्दार्थ दारकुंडे व दिपक जगताप यांनी आणली होती. दारकुंडे यांनी अनातम रक्कम भरण्यासाठी चिल्लर आणल्याने निवडणूक निर्णय अधिकारी कक्षांतील कर्मचार्‍यांची मात्र चांगलीच धांदल उडालेली पहावयास मिळाली. ऐवढी चिल्लर आणण्याबाबत त्यांना विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की, बर्‍याच दिवसांपासून निवडणूक खर्चांसाठी एक एक व दोन दोन रूपयांचे कॉईन जमा करत होतो त्‍यामुळे ते तसेच जमा केले आहेत असे त्‍यांनी स्पष्ट केले.