Tue, Nov 13, 2018 23:38होमपेज › Nashik › जळगावात पुन्हा आगीने १४ घरे खाक 

जळगावात पुन्हा आगीने १४ घरे खाक 

Published On: Mar 23 2018 5:12PM | Last Updated: Mar 23 2018 5:12PMजळगाव : प्रतिनिधी

गेल्या महिन्याभरात दोन ठिकाणी आगीच्या घटनेत जवळपास 20 घरे भस्मसाथ झाली होती. आज पुन्हा एकदा पहाटे एमआयडीसी परिसरातील सुप्रीम कॉलनीत पार्टीशनची घरे असलेल्या वस्तीत अचानक आग लागली. या आगीमध्ये 12 संसाराची राखरांगोळी झाली. या आगीत लाखो रूपयांचे नुकसान झाले. 

एमआयडीसी भागातील सुप्रीम कॉलनी भागात रज्जाक कुरेशी यांच्या मालकीच्या जागेवर 6 तर शकुर नवाज पटेल यांच्या मालकीच्या जागेवर 8 घरे आहेत. या दोन्ही ठिकाणी 14 घरांमध्ये 12 कुटूंबे राहतात. सलीम कुरेशी यांच्या घरात प्रवीण पाटील, अरूण चौधरी, पानचंद पाटील, श्रीराम कुदनलाल पिंपळ, आशाबाई विलास कोळी, मिनाबाई रमेश कोळी हे भाड्याने राहतात. शकुर याच्या घरामध्ये नसरीन पटेल, शब्बीर दिलावर शहा, प्रवीण साळवे, आसीफ पठाण, ज्ञानेश्‍वर पाथरवट हे भाड्याने राहतात. आज शुक्रवार दि २३ रोजी सकाळी 3.30 वाजण्याच्या सुमार शकुर पटेल याच्या घराला अचानक आग लागली. या आगीच्या ज्वाळेमुळे शेजारी राहणार्‍यांना जाग आल्याने त्यांनी लागलीच बाहेर पळ काढला. तसेच आपल्या घरातील सिलेंडर सुध्दा बाहेर काढले. त्यामुळे पुढील होणारा मोठा अनर्थ टळला. सकाळी 3.30 वाजण्याच्या सुमारास आग लागल्यानंतर जळगाव मनपाचे अग्नीशामक दल हे जवळपास दिड तास उशिराने आल्याचा आरोप नागरिकांनी केला. अग्‍नीशामक दल लवकर आले असते तर ही हानी कमी करता आली असती असे नागरिकांनी म्‍हंटले. या आगीत जवळपास 15 लाखांच्या आसपास नुकसान झाले आहे. या आगीत नसरीन शकुर पटेल यांच्या मालकीच्या 6 बकर्‍या, बकरीची पिल्ले, 35 कोबड्या या घरात अडकून पड्ल्याने या आगीत जळून खाक झाल्या.