होमपेज › Nashik › जे जे होईल ते ते पाहावे : एकनाथ खडसे

जे जे होईल ते ते पाहावे : एकनाथ खडसे

Published On: Mar 11 2018 6:08PM | Last Updated: Mar 11 2018 6:15PMजळगाव : प्रतिनिधी

राज्यसभेवर आपण जाणार का? या प्रश्‍नाला बगल देत आमदार.खडसे यांनी तुका म्हणे जे जे होईल ते ते पाहावे असा संत तुकारामांचा श्‍लोक म्हणून या प्रश्नावर कोणतीही प्रतिक्रिया देण्याचे टाळले. असे असले तरी या उत्तरात त्यांनी अनेक संभावना आहेत असेही त्‍यांनी हजर जबाबी उत्तर दिले. ते भुसावळ येथील नाहाटा कॉलेज मध्ये पारितोषिक वितरण समारंभात आले होते. त्यावेळेस पत्रकारांनी त्यांना राज्यसभेवर जाणार का याबद्दल विचारले असता त्यांनी बोलणे टाळले.

भुसावळ कला,विज्ञान, पु.ओ.नाहाटा वाणिज्य महाविद्यालय भुसावळ या महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाला आ.एकनाथ खडसे उपस्थित होते. त्यावेळेस विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना ते म्हणाले की यश अपयश यात जास्त फरक नाही. यश हे आत्मविश्‍वासाने संपादन केले पाहिजे. मुलानी मेहनतीने,परिश्रमाने यश संपादन केले पाहिजे.आपण किती शिक्षण घेतले त्यापेक्षा किती आत्मविश्‍वासाने आपण शिक्षण घेतले हे महत्वाचे आहे.आपला आलेख चांगल्या दिशेने गेला पाहिजे. तसेच मी गेल्या 40 वर्षापासुन राजकारणात आहे. या काळात अनेक निवडणुका लढविल्या आहेत. त्यामध्ये एकही निवडणुक मी हारलेलो नाही. फक्त एक महामंडळाची निवडणूक होती. ज्यामध्ये एक मत चुकीने बाद झाले होते. त्यामुळे ती निवडणूक मी हारलो असे म्हणता येणार नाही. असे खडसे म्हणाले. आज जगातील माहिती 1 सेकंदात मिळते यामुळे वाचन संस्कृती संपत चालली आहे. मी विधानसभेतील साडेआठ तासाच्या भाषणासाठी 6 महिने अभ्यास केला होता.आपण किती वर्ष जगणार त्यापेक्षा ते किती चांगल्या प्रकारे जगणार हे महत्वाचे आहे. असे खडसे यांनी  विद्यार्थ्यांना मार्गदर्शनावेळी सांगितले.

हा कार्यक्रम संपल्यानंतर पत्रकारांनी आ.खडसे यांना आक्रोश मोर्चा विधानसभेवर धडकला आहे. त्यावर आपले मत काय असे विचारले असता,नो आक्रोश, नो कॉमेंट, नो मोर्चा असे म्हणून त्यांनी या प्रश्‍नाला बगल दिली. त्यानंतर आपण राज्यसभेवर जाणार का या प्रश्नावर त्यांनी तुका म्हणे जो जो होईल ते ते पाहावे असे म्हणून एक स्मिथ हास्य करित पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले. या श्‍लोकात अनेक अर्थ दडले आहेत. त्यांनी नाही ही म्हटले नाही व होकार ही दिला नाही.