Tue, Apr 23, 2019 20:19होमपेज › Nashik › नगरसेवक पृथ्‍वीराज सोनवणे यांचा भाजपला रामराम

नगरसेवक पृथ्‍वीराज सोनवणे यांचा भाजपला रामराम

Published On: Jul 11 2018 3:58PM | Last Updated: Jul 11 2018 4:03PMजळगाव : प्रतिनिधी 

गेल्या 20 ते 25 वर्षापासून भाजपाचे काम करित असलेले विद्यमान नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांना भाजपने उमेदवारी नाकारल्याने जळगाव महानगर पालिकेत शेवटच्या दिवशी त्यांनी भाजप सदस्यत्‍वाचा व आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा देत शिवसेनेच्या चिन्हावर आपली उमेदवारी दाखल केली आहे.

 भाजपचे नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांना यंदा भाजपने उमेदवारी दिली नाही. त्यामुळे पृथ्वीराज सोनवणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा आयुक्त चंद्रकांत डांगे याच्याकडे दिला तर आपल्या भाजपला राम राम ठेकल्याचा राजीनाम महानगराध्यक्ष व आमदार सुरेश भोळे याच्याकडे सादर केला. आपले तिकिट कापले गेल्याने आपण एकनिष्ठ असुन मनपात चांगले काम करून ही आपले तिकिट कापले गेल्याने आपण सर्व पदाचा राजीनाम देत असल्याचे त्‍यांनी म्‍हंटले आहे.