Sun, May 26, 2019 09:30होमपेज › Nashik › अंजली दमानिया यांच्या विरोधात अटक वॉरंट 

अंजली दमानिया यांच्या विरोधात अटक वॉरंट 

Published On: Feb 08 2018 7:44PM | Last Updated: Feb 08 2018 7:43PMजळगाव : प्रतिनिधी

माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यावर विविध आरोप करून बदनामी केल्याप्रकरणी मुंबई स्थित समाजसेविका अंजली दमानिया यांच्या विरोधात रावेर न्यायालयाचे न्यायाधीश डी.जी. मालविय यांनी गुरुवारी (दि.8) अटक वॉरंट बजावले आहे. दमानिया जिथे असतील तिथे त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.

समाजसेविका अंजली दमानिया यांनी आ. खडसे यांच्या जावयाची लिमोझीन कार, भोसरी एमआयडीसी येथील भूखंड प्रकरण, अपसंपदा गोळा करणे, कार्यकर्त्याचे लाचप्रकरण आदी विषयांवर अनेक गंभीर आरोप थेट जळगाव येथे येऊन केले होते. या प्रकरणी भाजपचे रावेर तालुकाध्यक्ष सुनील पाटील यांनी खडसेंची बदनामी केल्याचा खटला (क्रमांक ४१६) कलम (५०० व ५०१) नुसार दाखल केला होता. या खटल्याचे रितसर समन्स प्राप्त होऊनही अंजली दमानिया कोर्टात हजर होत नसल्याने अखेर गुरुवारी (८) रावेर न्यायालयाने दमानिया यांच्या विरोधात अटक वॉरंट बजावले आहे. या खटल्यात फिर्यादीतर्फे अ‍ॅड. चंद्रजित पाटील व अ‍ॅड.तुषार माळी हे काम पाहत आहेत.