Mon, Jul 15, 2019 23:42होमपेज › Nashik › अमळनेर तालुक्यात वीज पडून एक ठार, एक जखमी 

अमळनेर तालुक्यात वीज पडून एक ठार, एक जखमी 

Published On: Jun 27 2018 7:04PM | Last Updated: Jun 27 2018 7:04PMजळगाव : प्रतिनिधी 

अमळनेर तालुक्यातील निम येथे आज (बुधवारी) दुपारी कपिलेश्‍वर मदिर शिवारात वीज कोसळून एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर एक महिला जखमी झाली असुन, तिच्यावर ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहे.

 जळगाव जिल्ह्यात पावसाने चांगली हजेरी लावली असल्याने शेतीच्या कामांना वेग आला आहे. त्यामुळे अमळनेर तालुक्यातील निम येथे सुध्दा गुलाब हिरामणा चोधरी यांच्या शेतात कपाशी निंदणीचे काम सुरू होते. घरचे काम असल्याने मजुरासह घरची मंडळी सुध्दा शेतात कामाला होती. निंदणीचे काम सुरू असतांना दुपारी अचानक जोरदार पावसाला सुरवात झाली त्याचबराबेर विजांचा कडकडाट होवू लागला. पाऊस आल्याने मजुरवर्ग चिंचेच्या झाडाखाली उभी राहिली. त्याचवेळी एक मोठा आवाज आला आणि चिंचेच्या झाडावर विज कोसळली. त्यात ललिता रविद्र भिल ही महिला जागीच ठार झाली. तर नेहा गुलाब चौधरी ही तरूणी गंभीर जखमी झाली.

नेहा जखमी झाल्याने तिला गावातील डॉक्टरांकडे नेण्यात आले. त्याठिकाणी तिच्यावर उपचार सुरू आहेत.