होमपेज › Nashik › संपामुळे उपजिल्हाधिकार्‍यांनी स्‍वत:चं उघडले कार्यालय

संपामुळे उपजिल्हाधिकार्‍यांनी स्‍वत:चं उघडले कार्यालय

Published On: Aug 07 2018 4:50PM | Last Updated: Aug 07 2018 4:50PMजळगाव : प्रतिनिधी 

तीन दिवस पुकारण्यात आलेल्या राज्य व्यापी संपात जळगाव जिल्ह्यातील महसुल विभागातील सर्व तृतीय व चतुर्थ श्रेणीतील 1100 कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यामुळे आज सकाळी नेहमीप्रमाणे राजपत्रीत अधिकारी आपल्या कार्यालयात आले, मात्र चतुर्थ श्रेणीचे कर्मचारी रजेवर असल्याने स्वत: राजपत्रित अधिकार्‍यांनी त्यांची कार्यालये स्‍वतचं उघडली. तर जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांना आज आपली कामे स्वत: करावी लागली. तरी सुध्दा जिल्हाधिकार्‍यांच्या चेहर्‍यावर नेहमीप्रमाणे हास्य दिसत होते. 

तृतीय व चतुर्थ श्रेणीचे कर्मचारी राज्य व्यापी संपात सहभागी झाले होते. सकाळी 10 वाजता कर्मचारी आपापल्या कार्यालयात आले मात्र कोणीही थंम्‍ब केले नाही. कामावर आले मात्र ते काम करण्याएवजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उभारण्यात आलेल्‍या मंडपात सुरू असलेल्‍या संपात सहभागी झाले. यावेळी कर्मचार्‍यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. तृतीयश्रेणी व चतुर्थ श्रेणीचे कर्मचारी कामावर नसल्याने कार्यालयात शुकशुकाट होता. राजपत्रती अधिकारी आपल्या दालनात बसुन टेबलावरील काम पूर्ण करण्यात मग्न होते. मात्र कर्मचारी संप असल्याने भेटणार्‍यांची संख्या नाहीच्या बरोबर होती. कर्मचारी कामावर नसल्याने अधिकारी एखादी माहिती पाहिजे असल्यास स्वत: किवा टेलिफोन व्दारे संबंधित खात्यातील अधिकार्‍यांकडून मागवत होते. जिल्हाधिकारी कार्यालय,महानगर पालिका, जिल्हा सामान्य रूग्णालय, तहसिल कार्यालय, कृषि विभाग,पाटबांधारे विभाग,सिंचन विभाग, आदी ठिकाणी शुकशुकाट दिसत होता.

 कर्मचारी संपात सहभागी झाल्याने आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालये स्वत: अधिकार्‍यांनी उघडले. जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुडके यांनी आपले कार्यालय सकाळी स्वत: चावी घेवून उघडले, तर जिल्हाधिकारींचे कार्यालय राजपत्रीत अधिकार्‍यांनी उघडले.

कर्मचारी जरी संपात असले तरी आपले नेहमी प्रमाणे काम सुरू आहे. थोडी फार अडचण येते मात्र विशेष असे काही नाही. तालुक्यातील कामे किवा सुनावण्या असतील ते येणार नाही. मी नेहमी प्रमाणे सकाळी 9.45 वाजेला कामावर आलो. माझ्या टेबलावरील काम पूर्ण करण्यावर लक्ष देत आहे. असे जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले. 

संपात महसुल विभागाचे 1100 कर्मचारी सहभागी : 

या संपात जळगाव जिल्ह्यातील महसुल विभागातील गट : क वर्गातील कर्मचारी 1161 कर्मचारी असुन त्यापैकी 156 पदे रिक्त असुन, 48 रजेवर आहेत. तर संपात 957 कर्मचारी रजेवर आहे. तर गट- ड वर्गातील कर्मचारी 199 असुन 52 पदे रिक्त आहेत. 4 जण रजेवर असुन त्यामुळे 143 कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. तर महानगर पालिका, जिल्हा सामान्य रूग्णालय व ईतर सेवामधील कर्मचारी संपात सहभागी झाले होते.