Tue, Jul 23, 2019 16:42होमपेज › Nashik › स्वच्छ सर्वेक्षण शहरांच्या यादीत जळगाव ८४ व्या क्रमांकावर 

स्वच्छ सर्वेक्षण शहरांच्या यादीत जळगाव ८४ व्या क्रमांकावर 

Published On: Jun 24 2018 9:55AM | Last Updated: Jun 24 2018 9:55AMजळगाव (जि. नाशिक) : प्रतिनिधी

स्वच्छ शहर सर्वेक्षणात गेल्या वर्षी १६४ व्या स्थानावर असलेले जळगाव शहर यावर्षी ८४ व्या क्रमांकावर आले आहे. पहिल्या १०० शहरात जामनेर ४६ व्या, भुसावळ ६९ व्या, वरणगाव  ७५ व्या स्थानी आहे. यात भुसावळ व जळगाव हे अमृत योजनेत आहेत. इतर ठिकाणी ही योजना नाही. गेल्यावर्षी स्वच्छ शहर सर्वेक्षणात जळगावचे नाव कौतुकाने घ्यावे अशी स्थिती नव्हती. मात्र, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी जवळपास ११ महिने मनपाचे प्रभारी आयुक्त म्हणून काम करताना स्वच्छताविषयक बरेच प्रयत्न केले. त्याचे फळ म्हणून हा क्रमांक आला आहे. 

निंबाळकर यांनी अनेक व्यापारी संकुले पाहिली आणि प्रत्येक प्रभागाचा दौरा केला. मनपाच्या स्वच्छताविषयक ठेक्यांमधील अनियमितता लक्षात आली. त्यांनी दूर केली त्यात दुकानदारांना आपल्या  दुकाना समोर स्वच्छता ठेवण्याचे आव्हान केले ते त्यानी पाळले ज्यांनी अस्वच्छ ता केली त्यावर कारवाई सुध्दा केली.  

मनपाने वर्षभरात ५, ६०० व्यक्तिगत शौचालये बांधली. २१० सार्वजनिक शौचालये बांधली. एवढ्याच बळावर मनपाला पहिल्‍या शंभरमध्ये स्थान मिळाले. अर्थात, प्रभागातील कचरा गोळा करायची आजही बोंब आहे. ठेकेदारांची बदमाशी सुरुच आहे. मनपाचे कर्माचारी कागदावरच आहे. कचरा प्रक्रिया प्रकल्प बंद आहे. मनपाचा स्वच्छता यादीत वर चढलेला हा क्रमांक तांत्रिक आहे. तरीही राजे निंबाळकर, महापौर ललित कोल्हे, यांच्यासह स्वच्छता व आरोग्य विभागाचे अभिनंदन केले. नव्या आयुक्तांनी हा क्रमांक अजून वर नेण्याची संधी आहे मात्र, त्यापूर्वी जळगाव मनपा निवडणूक आहे, त्यामुळे स्वच्छतेकडे दुर्लक्ष करू नये असे आवाहन केले आहे.