Wed, Jul 24, 2019 06:22होमपेज › Nashik › जळगाव महापालिकेवर भाजपचं निर्विवाद वर्चस्‍व

जळगाव महापालिकेवर भाजपचं निर्विवाद वर्चस्‍व

Published On: Aug 03 2018 8:49AM | Last Updated: Aug 03 2018 3:55PMजळगाव : प्रतिनिधी

जळगाव शहर महापालिका सार्वत्रिक निवडणूक होऊन शुक्रवारी (दि.3) मतमोजणी होत असून,19 प्रभागांतील 75 जागांसाठी 303 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. भाजपा व शिवसेनेने बहुमताचा दावा केला असला तरी मनपावर कुणाचा झेंडा फडकणार हे मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीत शहरात 55.72 टक्के मतदान झालेले आहे.

एमआयडीसीतील आदित्य लॉन्सवर सकाळी 10 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणीसाठी सहा पथके तयार करण्यात आली आहेत. प्रत्येक पथकात एक निवडणूक निर्णय अधिकारी व तीन सहायक अधिकारी राहणार आहेत. प्रत्येक प्रभागासाठी दोन टेबल तर एका पथकाकडे तीन प्रभागांची मतमोजणी होणार आहे. दुपारी 1 वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होणार आहे. अंतिम निकाल दुपारी दोन वाजेपर्यंत हाती येतील. या निवडणुकीकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Live अपडेट :

* मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज

* मतमोजणी ठिकाणी उमेदवार जात असताना त्‍यांची तपासणी करून सोडण्‍यात येत आहे. 

* मतमोजणी ठिकाणी उमेदवारांना मोबाईल नेण्‍यास मनाई

* मोबाईल बाहेर ठेवण्‍याच्‍या पोलिसांकडून सूचना 

* जळगाव महापालिकेतील पहिला कल हाती 

* भाजप : २

* शिवसेना : २

* काँग्रेस : 

* राष्‍ट्रवादी : 

* अन्‍य : 

* १९ प्रभागांच्‍या मतमोजणीला प्रारंभ झाला. प्रत्‍येक दोन टेबलावर एका प्रभागाची मतमोजणी सुरू, असे ३८ टेबलावर मतमोजणी सुरू

*  भाजपला ३ आणि शिवसेनेला २ जागांवर आघाडी 

* सर्व पत्रकार आयुक्‍तांना भेटण्‍यासाठी जात असताना सपोनि सचिन खांमगळ यांनी जाण्‍यास मज्‍जाव केला, सर्व पत्रकारांनी आयुक्‍तांचा निषेध केला

*  भाजपला ३ आणि शिवसेनेला ६ जागांवर आघाडी 

*  भाजपला ७ आणि शिवसेनेला ६ जागांवर आघाडी 

*  भाजपला १२ आणि शिवसेनेला ७ जागांवर आघाडी 

* प्रभाग १९  मध्‍ये शिवसेनेला ३ जागा, शिवसेना विजयी- लता सोनवणे, गणेश सोनवणे, जिजाबाई भापसे (अपक्ष)

* भाजपला ३० आणि शिवसेनेला २२ जागांवर आघाडी 

* एमआयएमचा १ उमेदवार पुढे

* भाजपला ३४ आणि शिवसेनेला २३ जागांवर आघाडी  

*  प्रभाग -१५

शिवसेना २

भाजप १

सपा १

आघाडीवर -

*  प्रभाग- ४

शिवसेना १

भाजप 

आघाडीवर -

*  प्रभाग- ५

शिवसेनेचे

विष्णू भंगाळे

राखी सोनवणे

नितीन लढ्ढा

*  तिन्ही माजी महापौर आघाडीवर

 प्रभाग- ६

भाजप ३

अपक्ष १

* भाजपला ५७ आणि शिवसेनेला १४ जागांवर आघाडी 

* जळगावात भाजपचा ऐतिहासिक विजय, सुरेशदादा जैन यांना धक्‍का 

* जळगावात भाजपची बहुमताच्‍या दिशेने वाटचाल

* भाजप ५७, शिवसेना १४, एमआयएम ३ तर एक १ अपक्ष आघाडीवर आहे. आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी मीडिया कक्षात येऊन प्रसारमाध्‍यमांना ही माहिती दिली.

* शिवसेनेच्‍या सुरेशदादा जैन यांच्‍या गटाला मोठा धक्‍का  

* सर्व जागांचे कल हाती

प्रभागनिहाय आघाडी  - 
प्रभाग १ - भाजप ४ 

प्रभाग २ - भाजप ४

प्रभाग ३ - भाजप ४

प्रभाग ४ -भाजप ४ 

प्रभाग ५ - शिवसेना ४

प्रभाग ६ - भाजप ३, अपक्ष १ 

प्रभाग ७ - भाजप ४

प्रभाग ८ - भाजप ३, शिवसेना १

प्रभाग ९- भाजप ४

प्रभाग १० - भाजप ४

प्रभाग ११- ४ भाजप

प्रभाग १२- भाजप ३, शिवसेना १ 

प्रभाग १३- भाजप ४

प्रभाग १४- भाजप ४

प्रभाग १५- भाजप १, शिवसेना ३

प्रभाग १६ - १ शिवसेना, ३ भाजप 

प्रभाग १७- भाजप ४

प्रभाग १८ - एमआयएम ३, सेना १ 

प्रभाग १९ -  शिवसेना ३

* चोपडा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत सोनावणे यांच्‍या पत्‍नी विजयी 

* राष्‍ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला जळगाव मनपात खाते उघडता आले नाही

* जळगाव मनपाचे ७१ जागांचे निकाल जाहीर झाले आहे. त्यापैकी  प्रभाग १, २, ३, ४, ६, ७, ९, १०, ११, १३, १४, १६, १७ या  प्रभागातील चारही जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. 

* प्रभागातील अ प्रभागात शिवसेना तर ब, क, ड प्रभागात भाजपा विजयी झाले आहे प्रभाग १२ मध्ये अ, ड मध्ये शिवसेना ब, क जागांवर भाजप विजयी. 

* १८ प्रभागात अ, ब, क जागांवर एमआयएम उमेदवार विजयी तर ड जगावर शिवसेना उमेदवार विजयी

* प्रभाग १९ मधील ३ जागांवर शिवसेना विजयी झाली आहे.

* मंत्री गिरीष महाजन यांनी इतर पक्षातील सक्षम उमेदवार भाजपात आणले; नाराजांना शांत केले.

* सुरेश जैन यांचा प्रभाव मतदारांवर पडला नाही.

* भाजपकडे गिरीष महाजनांसारखे तगडे नेतृत्व होते. तर इतर पक्षांकडे विशेषतः काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे नेतृत्वाचा अभाव होता, त्यामुळे भाजपला यश  

* माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचा मतदारांवर प्रभाव पडला नाही.

* जळगाव महापालिकेवर भाजपचं निर्विवाद वर्चस्‍व