Thu, Mar 21, 2019 11:25होमपेज › Nashik › जळगाव मनपा निवडणूकीत १८९ अर्ज अवैध 

जळगाव मनपा निवडणूकीत १८९ अर्ज अवैध 

Published On: Jul 13 2018 8:35PM | Last Updated: Jul 13 2018 8:35PMजळगाव : प्रतिनिधी 

मनपा निवडणुकीत गेल्या दोन दिवसापासुन अर्ज छाणणी प्रक्रिया सुरू होती. ती आज संपली असुन या निवडणूकीत १८९ नामनिर्देशन पत्र अवैध झाले आहे. तर दहा पक्षाचे २२६ उमेदवार रिंगणात असुन त्याच बरोबर २०० अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. आता सर्व नेते पक्षातील नाराज कार्यकर्त्यांनी उमेदवारी दाखल केली असेल त्यांना समजविण्याचे प्रयत्न सुरू केले असल्याचे समजते. मनपा निवडणुकीसाठी ६५१ नामनिर्देशन भरले गेले होते. त्यापैकी 426 वैध ठरले आहे.

  जळगाव महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी ६१५ नामनिर्देशन भरण्यात आले होते. या नामनिर्देशन छाणणीला दोन दिवस लागले. या छाणणीत शिवसेनेच्या उमेदवारांचे ए.बी. फॉर्म भरतांना चुकी झाल्याने उमेदवारांना फटका बसला. त्यामुळे सेनेचे निवडणुकीच्या मैदानात ७१ उमेदवार राहिले आहे. तर काही उमेदवारांना शिवसेना पुरस्कृत करणार असल्याची चर्चा सुरू होती. मनपा निवडणुकीच्या रिंगणात सर्वाधिक २०० अपक्ष उमेदवार रिंगणात आहे. यात मोठ्या प्रमाणात नाराज असलेले उमेदवार रिंगणात असल्याचे चित्र आहे. पक्षाच्या नेत्यांचे नाराज असलेल्या कार्यकर्त्यांकडे मोर्चा वळवला असुन त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मनधरणी सुरू असल्याचे बोलले जात आहे. 

भाजप- 75, सेना-71, राष्ट्रवादी 44, कॉग्रेस -17, एमआयएम- 6, हिन्दू महासभा -3, बीएसआरपी -2, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया -1, बसपा -1, सपा -1, अपक्ष 200 तर  एकुण 615 अर्ज भरले होते.