Thu, Apr 25, 2019 15:46होमपेज › Nashik › इच्छुकांना नाकारल्याने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अपक्षांची गर्दी 

इच्छुकांना नाकारल्याने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अपक्षांची गर्दी 

Published On: Jul 11 2018 3:19PM | Last Updated: Jul 11 2018 3:19PMजळगाव  : प्रतिनिधी

महापालिका निवडणुकीसाठी नामनिर्देशपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी (बुधवार दि.११) इच्छुक उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी लगबग चालली होती. तर भाजपासाठी 20 वर्षापासुन काम करणार्‍या प्रविण कुलकर्णी यांना तिकिट नाकारल्याने त्यांनी अपक्ष अर्ज भरून नाराजी व्यक्त केली. यावरून बरीच खलबते शिजत होते. इच्छुक आपले अर्ज भरण्यासाठी येत असतांना त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेल्या अनेक उत्साही कार्यकर्त्यांची महापालिकेबाहेर झुंबड उडाली होती. तर मनपाच्या मुख्यगेटवर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता की तेच उमेदवारांचा अर्ज पाहून त्याला त्याच्या अनुमोदक व सुचकाला गेटमधुन सोडत होते. त्यामुळे अनेक वेळा नागरिक व पोलिस याच्यात वाद होतांना दिसुन येत होते.

मनपा निवडणुकीसाठी भाजपा आणि शिवसेनेची युती होणार की, नाही याविषयी स्थानिक नेते, पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संभ्रम असल्याने अनेकांचे अर्ज मंगळवारपर्यंत दाखल होऊ शकले नव्हते. शिवाय भाजपासहीत शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यापैकी एकाही पक्षाने आपल्या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली नव्हती. त्यामुळे अनेक इच्छुकांनी मंगळवारचा दिवस प्रतिक्षा करण्यातच घालविला. 
आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. अर्ज ऑनलाईन भरून त्याची प्रिंटआऊट महापालिकेत सादर करायची होती. त्यासाठी सर्वच पक्षांच्या इच्छुकांची लगबग चालली होती. यात आजी-माजी नगरसेवक व त्यांच्या परिवावारातील सदस्यांचाही समावेश होता. अपक्ष उमेदवार मोठ्या संख्येने होते.   

शेवटच्या दिवशी होणारी गर्दी लक्षात घेऊन नेहरू चौक ते  भगवती स्वीटपर्यंतचा रस्ता बॅरिगेट्स लावून वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने केवळ एका बाजूनेच वाहतूक सुरू होती. होमगार्ड व पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात होता. अर्ज दाखल करण्यासाठी येणारे उमेदवार आणि त्यांच्या सोबतचे कार्यकर्ते यांना महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेरच अडविले जात होते. येथे पोलिसांकडून प्रत्येक व्यक्तीची चौकशी तसेच त्यांच्याकडे असलेल्या पिशव्यांची बारकाईने तपासणी केली जात होती. कार्यकर्त्यांना मात्र, आत प्रवेश दिला जात नव्हता. ये-जा करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था होती. महापालिकेचे विशेष पथक प्रत्येकाचे व्हिडिओ शूटिंग करीत होते.

पोलिसांच्या ‘अतिचौकशी’चा जाच
पोलिसांच्या ‘अतिचौकशी’चा मात्र, अनेकांना जाच झाला. बॅरिगेट्सच्या आत होमगार्ड व पोलीस तैनात होते. तेथूनच चौकशीच सत्र सुरू व्हायचे. दोन अथवा चारच्या ग्रुपने कुणी येताना दिसल्यास कुठे चालला, काय काम आहे? अशा प्रश्‍नांची सरबत्ती पोलीस व होमगार्डकडून व्हायची. महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ कार्यकर्ते व उमेदवारांची पुन्हा चौकशी केली जात होती. नवखा उमेदवार असल्यास त्याला आपण अर्ज दाखल करण्यासाठी आलो असल्याचे पटवून द्यावे लागत होते. दिग्गजांना मात्र, लागलीच प्रवेश मिळत होता. प्रवेशद्वाराशी पोलीस कर्मचार्याने एकदा चौकशी केल्यावर लागलीच त्याच्या मागे उभा असलेला दुसरा कर्मचारीही पुन्हा चौकशी करत होता. यामुळे काहींचे वादही झाले. पोलिसांचा नाहक जाच असल्याची भावना यावेळी उमटली. 

अर्ज भरण्यासाठी शिवसेनेचे नितीन लढ्ढा, शरद तायडे, विष्णु भंगाळे हे दुपारी 12.10 वाजता आले होते. भाजपाचे विद्यमान नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांनी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अचानक सेनेचे गजानन मालपुरे यांच्यासोबत येवून शिवसेनेकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मनसेचे बंटी जोशी व माजी महापौर ललित कोल्हे यांचे कट्टर समर्थक होते त्यांनी शिवसेनेकडून आपला उमेदवारी अर्ज भरला. त्यानंतर भगत बालाणी, शिवचरण ढंडरो आणि माजी महापौर ललित कोल्हे यांनी दुपारी 1.45 वाजता भाजपाकडून अर्ज दाखल केला. त्यावेळी पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले की, युतीचा विषय हा वरिष्ठ नेत्यांचा आहे. आम्ही 50 जागा जिंकू असेही ते म्हणाले.

ब्राम्हण समाजाची नाराजी 

जळगाव महापालिका निवडणुकीत ब्राह्मण समाजातील समाजश्रेष्ठींकडूनच निष्ठावंत उमेदवारांची नावे डावलण्यात आल्याचा आरोप करीत काही ब्राम्हण समाज बांधवांमधील प्रवीण व निलेश कुलकर्णी गटाकडून सकारात्मक असणार्रा समर्थकांकरवी सामाजिक माध्रमांवर नाराजीचा सुरू व्रक्त करण्रात रेत आहे. दरम्यान, सोशल वॉरमुळे दोन गट समोर आल्याचे चित्र आहे. राजेश नाईकांना विरोध होतच त्यांना देखील उमेदवारी न देता त्या प्रभागातून ऐनवेळी प्रभाकर सोनवणे यांना उमेदवारी दिली गेल्याचे समजते. एकंदरीत समाजाकडून एकाही सक्षम उमेदवाराला उमेदवारी न मिळाल्यामुळे सोशल मीडीयावर उमेदवार निवडीची रनणीती आखणाऱ्या समाजश्रेष्ठींसह नाईक यांच्याविरूध्द नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

समाजाचा एकही उमेदवार नसल्याची खंत आहे. आपल्याच लोकांनी घात केला अन् निष्ठावंत सक्षम उमेदवारांना डावलून जवळच्या माणसाला स्वत:च्या स्वार्थासाठी उमेदवार म्हणून नाव सुचविले. प्रवीण कुलकर्णी हे गेल्या 22 वर्षापांसून पक्षाशी एकनिष्ठ आहेत. परंतू, समाजश्रेष्ठींच्या जवळच्या माणसांनी स्वत:चे नाव पुढे करत त्यांचा बळी घेतला आहे. -भूपेश कुळकर्णी, भाजपा सरचिटणीस