Tue, Jul 23, 2019 07:07होमपेज › Nashik › मुक्ताईनगर नगरपचायतीत भाजपाचे वर्चस्व

मुक्ताईनगर नगरपचायतीत भाजपाचे वर्चस्व

Published On: Jul 20 2018 4:54PM | Last Updated: Jul 20 2018 4:54PMजळगाव : प्रतिनिधी 

 भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांच्या बालेकिल्ला असलेल्या मुक्ताईनगर ग्रामपंचायतीचे  नगर पंचायतीत रुपांतर झाल्यानंतर प्रथमच निवडणूक झाली. त्यामध्ये भाजपने खडसे यांच्या नेतृत्वाखाली बहुमत मिळविले.  भाजपच्या मुस्लिम महिला लोकनियुक्त नगराध्यक्षा म्हणून विराजमान झाल्या आहे. 

या निवडणूक भाजप विरूध्द सर्व विरोधी पक्ष अशी होती. तरी मात्र खडसेंनी आपले बहुमत व लोकनियुक्त नगाराध्यक्ष विजयी करून आपले नगरपंचायतीवर वर्चस्व सिध्द केले. नगर पंचायातीच्या १७ जागापैकी भाजपाने नगराध्यक्षसह १४ जागांवर दणदणीत विजय मिळवून आपले बहुमत सिध्द केले. ३ जागावर शिवसेना व एका जागेवर अपक्ष उमेदवाराने बाजी मारली. यामुळे खडसे यांची मुक्ताईनगर नगर पंचायतीवर एक हाती सत्ता आली.

नगरपंचायतीच्या निवडणुकीतील विजयी उमेदवार 

प्रभाग १: संतोष कोळी- भाजप (२४६), प्रभाग २: शबनबी या आरिफ- भाजप (३८९), नुसरत खान अपक्ष (३३३), प्रभाग ४- बिलकस आमनुनाह- भाजप (३२४), प्रभाग ५- शमीन अहमद खान - भाजप (३२४), प्रभाग ६- मुकेश वानखेडे भाजप( ४३५), प्रभाग ७- पियुष मोरे- भाजप (४००), प्रभाग ८- साधना संसारे - भाजप( ५७९), प्रभाग ९- बागवान बिलकीस बी- भाजप (२९४), प्रभाग १० - खाटीक शेख - भाजप (२३८), प्रभाग ११- शेख मस्तान- भाजप (३६२), प्रभाग १२- संतोष मराठे- शिवसेना (४११), प्रभाग १३- कुंदा अनिल पाटील- भाजप (६०९), प्रभाग १४- सविता बलबले - शिवसेना (४०५), प्रभाग १५- निलेश शिरसाट- भाजप (३३८), प्रभाग १६ - मनीषा पाटील भाजप, प्रभाग १७- राजेंद्र हिवरले- शिवसेना.

नगराध्यक्षपदासाठीची चूरस

नगरपंचायत निवडणूकीत भाजपच्या नजमा तडवी यांचा ११७५ मतांनी विजय झाला. मतमोजणी दरम्यान नगराध्यक्षपदाच्या लढतीत मतांचा चढउतार सुरु असल्याने उत्कंठा वाढली होती. अखेर नजमा तडवी यांनी विजय खेचून आणला.