Fri, Jul 19, 2019 22:15होमपेज › Nashik › जळगाव : मनसेला धक्का; महापौर कोल्हेंचा भाजपप्रवेश

जळगाव : मनसेला धक्का; महापौर कोल्हे भाजपात

Published On: Jul 09 2018 8:06AM | Last Updated: Jul 09 2018 9:33AMजळगाव  : प्रतिनिधी

जळगाव महापालिकेचे विद्यमान महापौर ललीत कोल्हे यांनी काल (रविवार) रात्री ९ वाजता आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला यामुळे जळगावच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कोल्हेंनी काही दिवसांपूर्वी  सांगितले होते की, मी खान्देश विकास आघाडीत प्रवेश केला आहे. मात्र पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत कोल्हे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

ललीत कोल्हे यांनी मनसेच्या तिकिटावर गत महापालिका निवडणुकीत तब्बल १२ नगरसेवक निवडून आणले होते. बदलत्या राजकीय घडामोडींमध्ये त्यांना महापौरपदाचीही संधी मिळाली. दरम्यान, निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर त्यांनी आमदार सुरेशदादा जैन यांच्या सोबत निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती. यामुळे जळगावातील मनसेला जबर धक्का बसला होता. यानंतर काही दिवस उलटत नाही तोच आता ललीत कोल्हे आणि त्यांच्या समर्थकांनी  भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पालकमंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला यावेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आमदार राजूमामा भोळे, आमदार चंदूभाई पटेल आदी मान्यवर उपस्थित होते. 

कोल्हे यांच्या भाजप प्रवेशामुळे जळगावच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आता युती होणार की नाही? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. युती न झाल्यास आ. सुरेशदादा जैन यांचा गट, भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये तिरंगी लढत होण्याचे चिन्ह आहेत.