Sun, Mar 24, 2019 12:29होमपेज › Nashik › जळगावः ट्रक आणि कारचा भीषण अपघात; 5 ठार

जळगावः ट्रक आणि कारचा भीषण अपघात; 5 ठार

Published On: May 12 2018 8:17AM | Last Updated: May 12 2018 11:03AMजळगावः प्रतिनिधी

येथील पारोळा तालुक्यातील दळवेला गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रं 6वर झालेल्या भीषण अपघातात 5 जण ठार झाले आहेत. इतर पाच जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गोरख मुहुर्तावरील लग्न लावून परतणाऱ्या वाणी कुटुंबावर काळाने घाला घातला. धुळ्यावरून पाचोराकडे जात असताना पहाटे सव्वा चारच्या दरम्यान हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. मृतांच्यामध्ये तीन महिला आणि दोन पुरूषांचा समावेश आहे.

अधिक माहिती अशी, वाणी कुटुंबीय धुळे येथून भाचीचा लग्नसमारंभ आटोपून जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे परतत असताना पहाटे धुळे मार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात पाचोरा दत्त कॉलनीत राहणाऱ्या वाणी (अलहीत) परिवारातील ५ जागेवरच ठार तर ४ जण गंभीर जखमी झाले. या अपघातामुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

मयत -1) चेतन नारायण महाजन (रा. दुसखेडा ता. पाचोरा ईको चालक आणि मालक) 2) प्रितम बंडू वाणी  3)अनिता रमेश वाणी  ४)शांताबाई सुरेश वाणी ६)निलिमा बंडू वाणी सर्व रा. पाचोरा

Tags : jalgaon, 5 death, truck and car accident, nashik news