Tue, Nov 20, 2018 02:04होमपेज › Nashik › नाशिक : अकार्यक्षम मुख्याधिकाऱ्यांची बदली

नाशिक : अकार्यक्षम मुख्याधिकाऱ्यांची बदली

Published On: Jun 13 2018 9:44PM | Last Updated: Jun 13 2018 9:44PMनांदगाव : प्रतिनिधी 

नांदगांव पालिकेच्या कामकाजात अकार्यक्षम आसल्याचा ठपका आसलेले  मुख्यधिकारी यांची आखेर बदली करण्यात  आली आहे. सुत्रांनी ही माहिती दिली आहे.

नांदगांव पालिकेच्या आनेक ठरावांची अमलबजावणी न करणे, उशीरा कार्यालयात येणे या सारखे वेगवेळे आरोप आसलेले पालिकेचे मुख्याधिकारी विश्वभंर दातीर यांची श्रीगोंदा येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर शिंदखेडा येथील अजित निकत यांची नियुक्ती करण्यात आली.  पालिकेचे मुख्याधिकारी विकासकामांना सहकार्य करीत नसल्याच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी करण्यात आल्या होत्या पंचायत समितीच्या आढावा बैठकीला आलेल्या ग्राम विकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या पुढ्यातच नगराध्यक्ष राजेश कवडे यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार केली. तसेच जिल्हाधिकारी यांचेकडे देखील तक्रार केली होती.  बदलीचे आदेश आज दि १३ रोजी मिळाल्याने निकत उद्या गुरुवारी रुजू होतील अशी चर्चा पालिका वर्तुळात सुरु होती.