Mon, Nov 12, 2018 23:35होमपेज › Nashik › वाहने सावकाश चालवा, प्रशासन झोपलेले आहे!

वाहने सावकाश चालवा, प्रशासन झोपलेले आहे!

Published On: Dec 04 2017 1:36AM | Last Updated: Dec 03 2017 11:33PM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी 

बेशिस्त वाहतुकीबाबत वारंवार तक्रार करूनही दखल न घेणार्‍या प्रशासनाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गांधीगिरी मार्गाचा अवलंब केला आहे. वडाळा-पाथर्डी रस्त्यावर मनसेने एक फलक लावला असून, फलकावरील ‘वाहने सावकाश चालवा, प्रशासन झोपलेले आहे’ हे उपरोधिक वाक्य परिसरात चर्चेचा विषय ठरले आहे.

वडाळा-पाथर्डीरोड या रस्त्यावर अपघातांच्या घटनांत दिवसेंदिवस  वाढ होत आहे. याच मार्गावर अवजड वाहतुकींचेही प्रमाण वाढले आहे. त्याबाबत वारंवार स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला; मात्र त्यानंतरही याची दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकार्‍यांनी येथे उपरोधिक सूचना असलेला फलक लावत गांधीगिरी केली आहे.

स्थानिक मनसे पदाधिकारी निकितेश धाकराव, प्रतीक राजपूत, धीरज भोसले, नीलेश लाळे, स्वराज ताडे, प्रथमेश पूरकर यांच्या संकल्पनेतून ही गांधीगिरी करण्यात आली आहे.