Tue, Mar 19, 2019 15:31होमपेज › Nashik › कांदा निर्यातमूल्य वाढविण्याचा घाट!

कांदा निर्यातमूल्य वाढविण्याचा घाट!

Published On: Dec 27 2017 1:22AM | Last Updated: Dec 27 2017 12:08AM

बुकमार्क करा

लासलगाव : वार्ताहर

स्थानिक बाजारपेठांमधील कांद्याचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने 23 नोव्हेंबरला कांद्यावरील निर्यातमूल्य 850 डॉलर प्रतिटन केले. तरीही कांद्याचे सरासरी भाव अजूनही अडीच हजारांच्या पुढेच असल्याने पुन्हा निर्यातमूल्यात 200 डॉलर्सची वाढ करण्याचा घाट घातला जात आहे. तसे झाल्यास कांद्यावरील किमान निर्यातमूल्य 1050 रुपये डॉलर होऊन कांदा कोसळण्याची भीती आहे.

गेल्या काही दिवसांपासून स्थानिक बाजारपेठांमध्ये कांद्याचे दर स्थिर असून, दररोज लासलगाव मुख्य बाजार समिती आवारात 32 हजार ते 37 हजार क्‍विंटल कांद्याची आवक होत आहे. तर संपूर्ण जिल्ह्यात दोन ते अडीच लाख क्‍विंटल आवक होत आहे.