Sun, Apr 21, 2019 05:47होमपेज › Nashik › वाहतुक शिस्तीत नाशिककर १ नंबर 

वाहतुक शिस्तीत नाशिककर १ नंबर 

Published On: Jun 14 2018 8:06PM | Last Updated: Jun 14 2018 8:06PMनाशिकरोड : प्रतिनिधी 

वाहनाची वाढती संख्या पाहता आज सर्वच शहरात वाहतुकीची समस्या ही डोकेदुखी होवून बसली आहे. पुणे, मुंबई यासारख्या मेट्रो सिटीमध्ये तर याबाबत बोलायचे कामच नाही. वाहन चालकांकडून ट्रफिक नियमाचे सर्रास उल्लंघन होताना दिसत आहे. मात्र यासर्व गोष्टीला नाशिककर अपवाद आहेत. कारण नाशिककर वाहतुकीच्या नियमांचे तंतोतण पालन करत आहेत. यामुळे वाहतुकीच्या शिस्तीत नाशिकरांचा एक नंबर लागतो.  राज्यातील इतर शहराच्या तुलनेत नाशिक शहरामधील नागरिक याबाबत जागरूक असून जनजागृती वाढताना दिसते. विशेष करून तरुणामध्ये हे प्रमाण जास्त असल्याचे असल्याचे दिसते, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त रविंद्र सिंघल यांनी केले.

नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या आवारात आज, गुरुवारी (दि.१४) वॉक विथ रोड सेप्टि कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थित शहर पोलीस आयुक्त रविंद्र सिंगल हे होते. यावेळी बोलताना सिंगल म्हणाले की , पोलीस अधिकारी येतात आणि जातात मात्र त्यांनी शहाराकरिता काहीतरी विशेष काम करायला हवे. सामान्य लोकांना आदर्शवत करण्याचे काम अधिकाऱ्यानी केले तर त्यांचे नाव सामान्य जनतेत कायम स्मरणात राहील, त्याप्रमाणे अधिकाऱ्यांनी काम करावे असे मत सिंगल यांनी व्यक्त केले. 

यावेळी कार्यक्रमाच्या  सुरुवातीला वाहतूक पोलीस म्हणून सामाजिक काम करणाऱ्या पार्थ गडाख, प्रणव विसपुते, आयुष्य निकम,  प्रथमेश बेलदार, नित्या राठोड, आस्था चव्हाण या युवकांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर संदीप श्रीवास्तव, निलेश जगताप, विशाल खैरनार, अभिजित तकाटे, संतोष जाधव आदीना मोफत हेल्मेटचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर  प्रामाणिक रिक्षा चालकांचा सत्कार देखील करण्यात आला. 

याकार्यक्रमास पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, वाहतूक शाखेचे उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त अजय देवरे, राजू भुजबळ, मोहन ठाकूर, विजय चव्हाण, नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे, उपनगर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.