Sun, Mar 24, 2019 12:57होमपेज › Nashik › अवैध मद्य वाहतूक प्रकरणी औरंगाबादचे संशयित ताब्यात

अवैध मद्य वाहतूक प्रकरणी औरंगाबादचे संशयित ताब्यात

Published On: Feb 20 2018 1:17AM | Last Updated: Feb 19 2018 10:59PMनाशिक : प्रतिनिधी

विनापरवानगी देशी- विदेशी मद्य वाहतूक करणार्‍या दोघांविरोधात त्र्यंबकेश्‍वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबाद येथील दोघा संशयितांना ताब्यात घेत त्यांच्याकडील कारसह सुमारे पावणे दोन लाख रुपयांचा मद्यसाठा स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी (दि.19) आंबोली -वेळूंजे परिसरातून जप्त केला. 

शेख नफिस शेख इकबाल (रा. टाकळी, जि. औरंगाबाद) आणि महेश माधव कांबळे (रा. नागसेननगर, औरंगाबाद) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अवैध मद्यनिर्मिती व वाहतूक करणार्‍यांविरोधात कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने पथक नेमूले असून, संशयितांची शोध मोहीम घेतली जात आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक कर्पे यांना जव्हार-त्र्यंबकेश्वर रोडने विनापरवाना देशी-विदेशी मद्याची चोरटी वाहतूक केली जाणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने या परिसरात सापळा रचला. रविवारी (दि.18) आंबोली-वेळुंजे रस्त्यावर पथकाने एमएच 04, ईएस 0170 क्रमांकाच्या कारची तपासणी केली असता त्यात दादरानगर हवेली निर्मित 23 हजार 472 रुपयांचा विदेशी दारूसाठा आढळून आला. त्यामुळे पथकाने दोघांनाही ताब्यात घेत त्यांच्याकडील कार आणि दारुसाठा असा 1 लाख 73 हजार 472 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.