Fri, Nov 16, 2018 02:24होमपेज › Nashik › नाशिक : पत्नीचा खून करून पती पोलिसात हजर

नाशिक : पत्नीचा खून करून पती पोलिसात हजर

Published On: Jun 27 2018 3:23PM | Last Updated: Jun 27 2018 3:23PMजळगाव : प्रतिनिधी

चाळीसगाव तालुक्यातील करगाव तांडा क्रमांक 4 येथे पती-पत्नीत भांडण झाले. या भांडणात पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉड घातल्याने पत्नीचा जागीच मृत्यू झाला. या प्रकारानंतर आरोपी स्वत:हून पोलिसात हजर झाला. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

करगाव तांडा क्रमांक 4 येथे अप्पा बाळू जाधव (47) व सखूबाई जाधव (42)हे पती -पत्नी आपल्या चार मुले, मुली असा परिवारासह राहतात. बुधवारी (आज) सकाळी काहीतरी कारणावरून या दोघांमध्ये भांडण झाले.हे भांडण  सुरू असताना पती अप्पा बाळू जाधव याने पत्नीकडे लोखंडी रॉड टाकला. सकुबाई याच्या डोक्यात रॉड लागला. यामुळे सकुबाई यांचा अती रक्तस्त्राव झाल्याने जागीच मृत्यू झाला.