Mon, Sep 24, 2018 19:24होमपेज › Nashik › नाशिक : डिझेल ओतून पत्‍नीला जाळणार्‍यास जन्‍मठेप

नाशिक : डिझेल ओतून पत्‍नीला जाळणार्‍यास जन्‍मठेप

Published On: Jan 23 2018 5:58PM | Last Updated: Jan 23 2018 5:58PMनाशिक : पुढारी ऑनलाईन

घरगुती भांडणाच्‍या कारणावरून पत्‍नीच्या अंगावर डिझेल टाकून तिला जाळणार्‍या पतीला जन्‍मठेप झाली आहे. आज येथील प्रधान जिल्‍हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी आरोपी पतीस शिक्षा सुनावली. राष्‍ट्रपाल आनंदा धाबो (वय २७) रा. कवठेकरवाडी, पांडवलेणी, नाशिक, असे जन्‍मठेप झालेल्या पतीचे नाव आहे. 

सरकारी वकील शिरीष कडवे यांनी या खटल्यात ११ साक्षीदार तपासले. त्यानंतर पती राष्‍ट्रपाल याच्यावर आरोप सिद्ध झाले होते. त्यानंतर न्यायालयाते या गुन्‍ह्यात आरोपी पतीला जन्‍मठेपेची शिक्षा सुनावली.