Tue, Nov 20, 2018 19:44होमपेज › Nashik › नाशिक : घोड्याचा पाय खड्‍ड्यात; स्‍वार जखमी

नाशिक : घोड्याचा पाय खड्‍ड्यात; स्‍वार जखमी

Published On: Feb 22 2018 5:46PM | Last Updated: Feb 22 2018 5:46PMसातपूर : वार्ताहर  

राज्यात सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी खड्‍डा मुक्‍त रस्‍त्यांची घोषणा केली असली तरीही खड्‍डे कायम आहेत. याच रस्‍त्यावरील खड्‍ड्यामुळे सातपूर विभागीय कार्यालयाबाहेर घोडा व घोडेस्‍वार थोडक्यात बचावले. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी केलेल्या खड्‍ड्यात वेगात चाललेला घोडा स्‍वारासह पडला. दोघांनाही जखमी अवस्‍थेत अग्‍निशामक दलाच्या जवानांनी बाहेर काढले. 

त्र्यंबकरोडवरील पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी विभागीय कार्यालयाबाहेर मोठा खड्‍डा काढला आहे. आज सकाळी वेगाने जाणारा घोडा स्‍वारासह या खड्‍ड्यात पडला. घोडा व घोडेस्‍वार दोघेही यामध्ये जखमी झाले. घोड्याला खड्‍ड्यातून बाहेर काढण्याचे प्रयत्‍न करूनही त्यात अपयश आले. त्यानंतर अग्‍निशामक दलाला पाचारण करण्यात आले. 

अग्‍निशामकच्या जवानांनी शिडी व दोरखंडाच्या सहाय्‍याने घोड्याची खड्‍ड्यातून सुटका केली. त्यानंतर स्‍थानिक लोकांनी हा खड्‍डा त्‍वरीत बुजवावा अशी मागणी केली. राज्याच्या बांधकाम मंत्र्यांनी ९० टक्‍के रस्‍ते खड्‍डे मुक्‍त केल्याची घोषणा केली. परंतु, नाशिक त्र्यंबक सारख्या धार्मिक स्‍थळांना जोडणार्‍या रस्‍त्यावर अजूनही खड्‍डे असल्याने नागरिकांनी यावर संताप व्यक्‍त केला.