Tue, Jul 16, 2019 11:36होमपेज › Nashik › हिमांशू रॉय यांच्या अस्थींचे नाशिकच्या रामकुंडात विसर्जन  

हिमांशू रॉय यांच्या अस्थींचे रामकुंडात विसर्जन  

Published On: May 14 2018 3:38PM | Last Updated: May 14 2018 3:38PMपंचवटी (जि. नाशिक): देवानंद बैरागी

राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक हिमांशू रॉय यांच्या अस्थींचे सोमवारी (दि.१४) शोकाकुल वातावरणात नाशिक येथील रामकुंडात विसर्जन करण्यात आले. रॉय यांनी शुक्रवारी (दि.११) रोजी कर्करोगाला कंटाळून स्वतःला गोळी मारून आत्महत्या केली होती. अचानक घडलेल्या या घटनेने राज्यासह पोलिस दलात एकच खळबळ उडाली होती. 

दिवंगत हिमांशू रॉय यांनी नाशिकचे पोलिस आयुक्तपद भूषविले असल्याने ते नाशिककरांना चांगले परिचित होते. त्यांच्या निधनाची वार्ता नाशिककरांना चटका लावून जाणारी ठरली. सोमवारी (दि.१४) सकाळी ७ वाजेच्या सुमारास रॉय यांच्या पत्नीसह त्यांची आई, मुले, बहीण, मेहुणे, यांच्या उपस्थितीत अस्‍थींचे वियर्जन करण्यात आले. खाजगी व कौटुंबिक विधी असल्याने, या कार्यक्रमाबाबत गोपनीयता पाळण्यात आली होती. याप्रसंगी नाशिकचे पोलिस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंघल, माजी महापौर अशोक मुर्तडक, डॉ. प्रदीप पवार, अतुल चांडक, पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनेश बर्डेकर, अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांच्यासह सेवानिवृत्त पोलिस अधिकारी व त्यांचे निकटवर्तीय उपस्थित होते.