Tue, Jul 23, 2019 06:18होमपेज › Nashik › चालत्या ट्रकमध्ये हृदयविकाराने चालकाचा मृत्यू

चालत्या ट्रकमध्ये हृदयविकाराने चालकाचा मृत्यू

Published On: Dec 03 2017 2:02AM | Last Updated: Dec 03 2017 2:02AM

बुकमार्क करा

जळगाव बुद्रुक : वार्ताहर

बोलठाण येथून सिमेंट खाली करून नांदगावकडे जात असलेल्या चालकाला ट्रक सुरू असताना ह्रदयविकाराचा जोराचा झटका आला आणि ते ट्रकच्या खाली कोसळले. मात्र, गाडीत असलेल्या हमालाने प्रसंगावधान राखत वेळीच ब्रेक दाबत गाडी थांबवली. अन्यथा ट्रक रस्त्याच्या शेजारी असलेल्या घरात घुसून मोठा अनर्थ घडला असता.

नांदगाव येथून एका खाजगी व्यापाऱ्याचे ट्रकमध्ये सिमेंट भरून भिवा काशीनाथ गोटे (वय-६५) हे  (ट्रक क्रमांक-एम. एच.४१,जी-६७९४) बोलठाण येथे गेले होते. ते सिमेंट खाली करून नांदगावकडे येत असताना जळगाव बुद्रुक शिवारात माणिकपुंज फाट्याजवळ अचानक त्यांना जोराचा ह्रदयविकाराचा झटका आला. ते काही कळायच्या आत ट्रकच्या खाली कोसळले. ट्रक समोरच्या घराला धडक देईल, असे वाटत असतानाच ट्रकमध्ये बसलेल्या हमालाने वेळीच ब्रेक दाबले व ट्रक थांबवला. यावेळी शेजारून कुठलेही वाहन जात नसल्याने तोही धोका टळला.