Sun, Aug 25, 2019 12:23होमपेज › Nashik › नाशिकचा हबीब सय्यद ‘कर्मवीर श्री’

नाशिकचा हबीब सय्यद ‘कर्मवीर श्री’

Published On: Feb 07 2018 1:38AM | Last Updated: Feb 06 2018 11:24PMसायखेडा : वार्ताहर

के. के. वाघ शिक्षण संस्था, स्माइल व स्पिनॅच संस्था, अजिंक्य वाघ यांच्या पुढाकाराने तसेच उत्तर महाराष्ट्रस्तरीय शरीरसौष्ठव संघटना यांच्या अधिकृत मान्यतेने उत्तर महाराष्ट्रस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा नाशिक येथे पार पडली. या स्पर्धेत ‘कर्मवीर श्री-2018’ हा किताब हबीब सय्यद, बेस्ट पोजरचा किताब भरत ठाकूर, मोस्ट इम्प्रुव्हड बॉडी बिल्डरचा किताब जहीर अहमद या शरीरसौष्ठवांनी पटकविला.
पद्मश्री कर्म. काकासाहेब वाघ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ के. के. वाघ शिक्षण संस्था, पंचवटी येेथे पार पडलेल्या स्पर्धेत 110 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. स्पर्धा शुभारंभाप्रसंगी वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष

बाळासाहेब वाघ, अविनाश पाटील, डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, अविनाश टिळे, मोईद्दीन शेख, प्रकाश पवार, रामनाथ पानगव्हाणे, पोलीस निरीक्षक चव्हाण, सुनील वाघ, दौलत वाघ, महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशनचे सरचिटणीस राजेंद्र सातपूरकर, संदीप बेडसे, प्रदीप बोराडे, हेमंत जाधव, शुभम वाघ, शाहू कावरे, दिनेश शेळके, अहमदनगर असोसिएशनचे जयंत गिते उपस्थित होते. सारंग नाईक यांनी सूत्रसंचालन केले.

गुणलेखक म्हणून किशोर सरोदे यांनी तर पंच म्हणून जयंत गिते, युसूफ शेख, भाऊदास सोनवणे, मोहम्मद आसिफ, हेमंत साळवे, कमलाकर आघाडे, प्रकाश दाभाडे, सोहील शेख, दिनेश शेळके, नीलेश संधान, तर स्टेज मार्शल म्हणून नदीम खान, राहुल बोडके, तारीक शेख यांनी काम बघितले. सुनील क्षीरसागर, तानाजी कांडेकर, प्रा. दिलीप मोरे, सुनील निरगुडे, प्रा. बंडू कोल्हे, प्रा. गवांदे, कैलास शिंदे, भगवान बचाटे, धनंजय कालूसे, दीपक पवार, रोहित पाटील, अमन कौले, अमोल गिरासे, मयूर नवले, गौरव रामसे, अभिलाषा सावंत, शीतल गोसावी, पर्णिका जोशी आदींनी परिश्रम घेतले.