होमपेज › Nashik › नाशिक : चोरीचा माल वाटणीवरून गोळीबार

नाशिक : चोरीचा माल वाटणीवरून गोळीबार

Published On: Aug 03 2018 9:16AM | Last Updated: Aug 03 2018 9:16AMमनमाड : पुढारी ऑनलाईन

मनमाडमध्ये दरोडेखोरांमध्ये दरोड्यातील माल वाटण्यावरून झालेल्या वादात गोळीबाराची घटना घडली. यामध्ये एकजण जखमी झाला आहे. शुक्रवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या गोळीबारानंतर परिसरात भीतीचे वातावरण होते.

दरम्यान, धुळे येथे डेरीवर दरोडा टाकून दरोडेखोर फरार झाले होते. यातील सागर मरसाठी आणि गणेश मरसाळे यांचा त्यांचा दुसरा सहकारी गुरु भालेराव याच्याशी दरोड्यातील मालाच्या वाटणीवरून वाद झाला. या वादातूनच त्यांनी भालेराववर गोळी झाडली. परंतु मागावर असलेल्या धुळे पोलिसांनी त्यांना गाठले. जखमी भालेराव व सागरला ताब्यात घेतले. तर गणेश मरसाळे हा आरोपी फरार आहे.