Fri, Apr 26, 2019 17:43होमपेज › Nashik › आखाजीचा पत्त्यांचा डाव पोलिसांनी उधळला

आखाजीचा पत्त्यांचा डाव पोलिसांनी उधळला

Published On: Apr 19 2018 2:44PM | Last Updated: Apr 19 2018 2:44PMनिबोंला 87 लाखाचा मुद्देमाला व रोकड जप्त;भालोदला 75 हजार रोकडसह 7 बुलेट जप्त

 जळगाव : पुढारी ऑनलाईन

आखाजी म्हणजेच जळगाव जिल्ह्यात पत्त्याचे डाव मोठ्या प्रमाणात सुरू असतात. दोन मोठे डाव पोलिसांनी धाड टाकून उधळून लावले. यात  रावेर तालुक्यातील निबोंल येथून पोलिसांनी 54 जणांसह 87 लाख 85 हजार 945 किंमतीची चारचाकी वहाने, मोटरसायकल, लाखोची रोकड जप्त केली आहे. 

तसेच यावल तालुक्यातील भालोद येथून 18 जणांसह 75 हजारांचा रोकडसह 7 बुलेट जप्त करण्यात आल्या आहेत. पोलिसांचा वचक संपलेला दिसत असून पोलिस यंत्रणा मोठी असूनही मोठ्या प्रमाणात जुगार अड्डे जिल्ह्यात सुरू आहेत. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी हे अड्डे सुरू आहेत.त्या ठिकाणच्या पोलिसांना याची माहिती मिळत नाही तर दुसर्‍या ठिकाणावरुन पोलिस अधिकारी येवून धाड टाकतात हे विशेष आहे.

Tags : gambling, crime news, jalgaon