Sun, Jul 21, 2019 16:11
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › खेळताना गॅलरीतून पडल्याने बालकाचा जागीच मृत्यू

खेळताना गॅलरीतून पडल्याने बालकाचा जागीच मृत्यू

Published On: Jan 31 2018 6:31PM | Last Updated: Jan 31 2018 6:31PMनाशिक : प्रतिनिधी

घरात खेळत असताना गॅलरीतून खाली पडल्याने चार वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना खोडेनगर येथील जेएमसीटी कॉलेजच्या पाठीमागील परिसरात घडली. हसनेन मोईन सैयद (वय ४) असे या बालकाचे नाव आहे. 

मंगळवारी (दि. ३०) हसनेन त्याच्या बहीणीसोबत घरात खेळत होता. खेळता खेळता तो गॅलरीत आला. त्यावेळी तोल गेल्याने तो गॅलरीतून खाली कोसळला. तिसर्‍या मजल्यावरून पडल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने परिसरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मोबाईल दुरुस्तीचे दुकानचालक असलेले मोईन सय्यद यांचा हसनेन हा एककुलता एक मुलगा होता. त्याच्या पश्‍चात दोन बहिणी, आई-वडिल असा परिवार आहे. खेळकर आणि हुशार असल्याने हसनेन सर्वांच्या आवडीचा होता. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.