Tue, Jul 23, 2019 11:19होमपेज › Nashik › ॲट्रॉसिटी कायद्याच्या बदला विरोधात नाशिक रोडला भव्य मोर्चा

ॲट्रॉसिटी कायद्याच्या बदला विरोधात नाशिक रोडला भव्य मोर्चा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

उपनगर : वार्ताहर 

ॲट्रॉसिटी कायद्याच्या बदला विरोधात नाशिक रोडला भव्य मोर्चा. कायद्याच्या शिथिलते विरोधात आर पी आय आठवले गट आणि मित्र पक्षांच्या वतीने नाशिक रोडवरील आंबेडकर पुतळ्‍यापासून विभागीय महसूल आयुक्त कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला.

ॲट्रॉसिटी कायद्याच्या बदला विरोधात नाशिक रोडला भव्य मोर्चा. मध्ये असणारी कलमे बदलण्याचा घाट घातला जात असून या मुळे मागासवर्गीय जनतेवर अन्याय वाढण्याची शक्यता आहे. त्‍यामुळे या विरोधात एकत्र येण्याची गरज असल्याचे मत प्रकाश लोंढे यांनी व्यक्त केले. तसेच जेथे अन्याय अत्याचार होत असेल त्या ठिकाणी आर पी आय नेहेमी रस्त्यावर येऊन लढते असे प्रकाश लोंढे यांनी सांगितले. या मोर्चात माजी नगरसेवक सुनील वाघ, संजय भालेराव, दिनेश जाधव, सागर क्षीरसागर, दया भालेराव, अमोल जाधव, अमोल पगारे, संतोष कटारे, समीर शेख, दिलीप दासवानी, किशोर खडताळे यासह कार्यकर्ते मोठ्‍या संख्येने उपस्‍थित होते 

Tags :  front, nashik road, against,change, Atrocity Act,


  •